पुणे कोलाड रोडवर; पौडया गावापासून १० किमी अंतरावर बेलावडे या गावात ढमाले देशमुखांचे दोन पुर्वाभिमुख चौसोपीवाडे आजही मोठ्या दिमाखात मुळशीच्या तसेच ढमाले देशमुखांच्या स्वराज्यनिष्टेची तसेच वैभवाची साक्ष देत उभे आहेत.
मावळ खोऱ्यातील ढमाले देशमुखांचा गौरवशाली इतिहास मोठ्या ताठमानेने या वाड्यांच्या रुपात आपणा दिसतो. यावाड्यांपैकी; एका वाड्याचा जीर्णोद्धार त्याच्या वंशजांनी केला आहे. यामुळे ढमाले देशमुखांचा इतिहास व पराक्रम आपणासमोर उभा राहतो. गावात प्रवेश केल्यावर आपण वाड्याजवळ येऊन; त्याच्यासमोर येऊन उभे राहतो. नक्षीदार कमानी असलेला दरवाजा,
तसेच मजबूत बांधा आपल्या नजरेत भरतो.
मुळशीतील ‘पौड’ याता लुक्याच्या गावापासून १० किमी अंतरावर वाघजाई डोंगराच्या पायथ्याशी ‘भादस’ गाववसलेले आहे. मुळानदीच्या तीरावरील ‘मौजेभादस बु. शिवकाळात उल्लेखले गेले आहे. या नावाने शिवशाहीतील कागदपत्रे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मितीत डोंगरकपारीतील राहणाऱ्याबलदंड आणि निष्ठावंत माणसांचे साहाय्य मिळवले. अशाच या गावचा ‘जोरीपाटील’ घराणा! त्यांचा पूर्णावस्थेत वाडा आज नसला तरी अवशेष रुपी गाव या घराण्याच्या कार्यकर्तृत्त्वाची आठवण करुन देतात.
मुळशीचं निसर्ग वैभव -देवराई – घुटकेची पाळणजाई , आडगावची म्हातोबा , भोडेची वाघजाई
देवराईचा इतिहास – वैदिककाळापासून देवराईची संस्कृती चालत आलेली आहे. देवराईच्या संकल्पनेत श्रद्धादडलेली असून देवावरील श्रद्धायुक्तभीतीचा प्रभावीवापर जंगलाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केला गेला.