आपली चौथी दुर्गा आहे चालेगावातील झाखुबाई माता. मुळशी तालुक्यातील पौड कोळवण हमरस्त्यावर चालेगावाच्या सुरवातीलाच झाखुबाई देवीच मंदिर आहे. मंदिरच बांधकाम हे लाकडी असून, सभामंडप प्रशस्त आहे. आत मध्ये देवीची काळ्या पाषाणातील शेंदूर चर्चित मूर्ती असून, मूर्ती ही चतुर्भुज आहे. या मंदिरच (देवीच) वैशिष्ट्ये अस की, नवरात्री मध्ये जी घटस्थापना होते. ती नऊ दिवस असते, पण या देवीचे घट हे सात दिवसांचे असतात.
तिकोणा गडावरील तळजाई माता.
मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यात हा किल्ला येतो.
पवन मावळाचा घाट रक्षक असलेला हा किल्ला.
याच किल्ल्यावरील गडदेवी तळजाई देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती असून, मूर्ती अतिशय विलोभनीय आहे.
तिकोणा गडावर तळजाई नावाच्या लेणीमध्ये देवीचे मंदिर असून लेणीमध्ये खूप सारे कोरीव काम केले आहे.
आतमध्ये विविध फुल कोरली असून त्यांवर खूप नाजूक नक्षीकाम केले आहे.
समोरच मोठा तलाव आहे.
आजची आपली दुसरी दुर्गा आहे, कोराईगडावरील कोराईदेवी. मुळशी तालुक्यातील कोरे बारसया मावळात कोराईगड हा किल्ला आहे. याच किल्ल्यावर गडदेवी कोराईदेवीची शेंदूर चर्चित चतुर्भुज मूर्ती असून, मूर्ती अतिशय विलोभनीय आहे. अशी अख्यायिका सांगितले जाते की १८१८ मध्ये जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला जिंकला तेव्हा देवीच्या अंगावरील सर्व दागिने इंग्रजांनी काढून घेतले, व पुढे ते मुंबईच्या मुंबादेवाला घालते आहेत. गडावर या मंदिराचे आता नूतनीकरण करण्यात आले असून, नवरात्री उत्सव काळात आजूबाजूच्या परिसरातील लोक दर्शनासाठी येत असतात. मंदिरातील वातावरण अतिशय प्रसन्न भक्तिमय झालेले दिसते. मंदिराच्या समोर मोठी दीपमाळ असून मंदिराच्या जवळच गडावरील सर्वात मोठी लक्ष्मी तोफ आहे.