पौड पासून पुढे कोळवण रोडवरून पुढे गेलो की डाव्या बाजूस भादस गावाकडे रस्ता जातो,
याच रोडवरील हुळावळेवाडीच्या डोंगरावरील नैसर्गिक गुहेत ग्रामदेवता वाघजाई व वनदेव यांची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहेत.
शेजारी शेजारी दोन गुहा असून यात या ग्रामदेवता विराजमान आहेत
मुळशीतील नवदुर्गा – शेरे गावातील पद्मावती माता मंदिर
मुळशी तालुक्यातील नवदुर्गा व त्यांची माहिती आपण जाणून घेते आहोत. आजची आपली सातवी दुर्गा आहे, शेरेगावची पद्मावती देवी. शेरे हे तालुक्यातील ऐतिहासिक गाव आहे. याच गावाच्या डोंगरावरील पद्मावती देवीचे जागृत स्थान आहे. देवीचे मूळ मंदिर हे डोंगरावर असून, नंतरच्या काळात हे मंदिर गावाजवळ आणले आहे. मंदिरातील देवीची मूर्ती ही चतुर्भुज असून पाषाणामध्ये कोरली आहे. जुन्या मंदिरातील मूर्ती ही चतुर्भुज असून ती सुद्धा पाषाणामध्ये कोरली आहे. मंदिर प्रशस्त असून सभामंडप मोठा आहे. देवीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. नवीन मंदिराचा परिसर हा निसर्गरम्य असून इथे जवळच स्मुतीशिळा आहे. वर्षभर ग्रामस्थांतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येतात. नवरात्रकाळात अनेक भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनाला येत असतात. कधी मुळशी तालुक्यात आल्यावर नक्की शेरेगावातील पद्मावती देवीच्या दर्शनाला या.
रिहेगावातील कुंजाई माता. मुळशी तालुक्यातील रिहे खोऱ्यातील रिहे या गावात कुंजाई देवीच जागृत देवस्थान आहे. देवीच मूळ मंदिर हे आता गावाच्या धरणातील पाण्याखाली गेलं आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी धरणाच्या किनाऱ्यावरच नवीन मंदिर बांधलं आहे. जुन्या व नवीन दोन्ही मंदिरातील देवीची मूर्तीही तांदळा स्वरूपातील आहे. या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये देवीच जुनं मंदिर हे बाहेर आले होते.