मुळशीच्या जीवनदायिनी मुळा – मुठा
मुळा- मुठा मुळशी तालुक्यातील या दोन प्रमुख मोठ्या नद्यांची आज आपण इतिहासापासूनची माहिती घेणार आहोत.
भीमामाहात्म्य या हस्तलिखित ग्रंथामध्ये दत्तकिंकर या कवीने भीमाची महात्म्येचे वर्णन केले आहे. यात भीमे सोबतच तिच्या उपनद्यांच्या रंजक कथासुद्धा यात संगीतल्याहे. त्यातीलच २६ व्या अध्यायात मुळा मुठा आणि भीमा यांच्या संगमाची वर्णने येतात खाली त्याच्या अध्यायाच्या शेवटच्या ओळी.
“इतिश्री पद्य पुराणे उत्तराखंडे भीमामाहात्म्ये मुळामुठा संगम महिमा नमषटविशतीनमो अध्याय”
भीमाशंकर पर्वतावर गजानन राजाने कठोर शिव भक्ती सुरू केली. त्यामुळं महादेव त्याला प्रसन्न होईल आणि आपलं इंद्र पद जाईल अशी भीती इंद्राला वाटू लागली. त्याने आपल्या दरबारातील दोन अप्सरांना गजाननाच्या चिंतनाचे कार्य तोडण्यासाठी पाठवले. इंद्राचा हा डाव गजाननाच्या लक्षात आला. त्याने त्या दोन अप्सरांना शाप दिला की ‘‘तुम्ही नदी व्हाल!’’ त्या अप्सरांनी गयावया केल्यावर त्यांनी उ:शाप दिला की भीमासंगम झाल्यावर तुम्हाला मुक्ती मिळेल. इंद्राच्या दरबारातील त्या अप्सरा मुळा-मुठा नद्यांच्या रूपाने वाहू लागल्या.
मुळा नदी.
मुळा नदी ही पौड खोऱ्यातील नांदिवली या गावाजवळ देवघर या ठिकाणी मोठ्या उंबराच्या झाडाच्या मुळापासून एक झऱ्याच्या स्वरूपात बाहेर पडते. म्हणूनच या नदीचे नाव मुळा असे पडले असे सांगितले जाते. पुढे या नदीला निळा नावाची उपनदी येऊन मिळते. आताही ती मुळशी धरणांमध्ये गेलेली आहे. त्यामुळं तिचा प्रवाह दिसत नाही. पुढे या नदीवर टाटा ग्रुपने एक मोठे धरण बांधले आहे. आज ते मुळशी धरण या नावाने प्रसिद्ध आहे. यावर मुंबई शहरासाठी लागणारी वीजनिर्मितीही त्याच ठिकाणी केली जाते. याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणारच आहोत. पुढे कोळवण खोऱ्यातून येणारी वळकीही छोटी नदी मुळेला मिळते. पुढे भुकुम गावाजवळ उगम पावणारी राम नदी मुळेलाजाऊन मिळते. पुढे पवना नदी पुण्यातील खडकी जवळ मुळा नदीला मिळते.
मुठा नदी.
मुठा नदीही मुठा खोऱ्यातील वेगरे गावाजवळील मांडव खडक वस्तीजवळ मुठा नदी सुरू होते. या उगमावरती एक गोमुख बसविलेले आहे. या नदीच्या उगम मुठा नावाच्या खेळकडीच्या बोळातून एक झरा बाहेर पडून झालं आहे. म्हणून हीच हे नाव मुठा असे पडले आहे. पुढे या नदीवर टेमघर हे धरण बांधले गेले आहे. दुर्दैवाने ते गळके निघाले आहे.
इथून पुढे येणाऱ्या मुठेला दोन नद्या येऊन मिळतात. एक आहे आंबी आणि दुसरी आहे मोसी. आंबी नदीवर पुढे पानशेत धरण बांधले गेले आहे. तर मोसी नदीवर वरसगाव हे धरण आणि नदी पुढे एकत्र जाऊन पुण्यातील प्रसिद्ध असे खडकवसला धरण बांधले गेले आहे. खडकवसला, वरसगाव, पानशेत टेमघर या ४ धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पुण्याला पाणीपुरवठा करण्यात येतो.
अश्या या मुळशी तालुक्यातील जीवनदायनी मुळा मुठा या बहिणी पुण्यातील संगम पुल येथे एकत्रित येऊन भीमा नदीला भेटायला पुढे जातात.
परंतु वाईट गोष्टीचे वाटते की मुळशीतालुक्यातून निघणाऱ्या या जीवनदायनी नद्या पुण्यात गेल्यावर मात्र त्यांचे गटारामध्ये रूपांतरित होतात. हजारो वर्षांपूर्वीच्या सभ्यतेचे, संस्कृतींचे अवशेष सापडलेल्या या नद्यांच्या खोऱ्यात आज मात्र सांडपाणी आणि फक्त दुर्गंधी पसरत आहे. हे कुठेतरी बदलले पाहिजे.
पुणे ते मुळा-मुठा नदी
कालावधी: १.३० ते २ तास
निसर्गरम्य वातावरणातून रस्त्याने जाणारी वाट.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. मुळा-मुठा नदी पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: मे 16, 2025
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा
मुळशीतील सौंदर्यरत्ने. "श्रावणविशेष" आंबेश्वर महादेव मंदिर आंबेगाव. नमस्कार मित्रांनो...
मुळशी तालुक्यातील ऐतिहासिक अशी पुष्करणी, (बारव) याविषयी माहिती घेणार...