खोंदाई देवी मंदिर

  • Author:
  • ५ मिनिटे वाचा

खोंदाई देवी मंदिर

खोंदाई देवी (मु.पो.मुठा – शेडगेवाडी माळेगाव ता. मुळशी जि. पुणे)
खोंदाई माता देवीचा महिमा (महालक्ष्मीचा अवतार)
वैष्णोदेवीचे विश्वप्रसिद्ध प्राचीन मंदिर जम्मू आणि काश्मीरमध्ये जम्मू परिसरातील कटरा नगरातील त्रिकुट उंच डोंगरावर आहे. त्याची उंची 5,200 आहे. या गुहेत माता राणी वैष्णोदेवीची स्वयंभू तीन मूर्ती आहेत – डाव्या बाजूला कालीका माता, उजव्या बाजूला सरस्वती माता आणि मध्ये भाग्य लक्ष्मी देवी या तीन पिंडी स्वरूपात आहेत. हे मंदिर जम्मू येथे आहे. त्याचप्रमाणे, माळेगाव येथील शेडगेवाडीच्या उंच डोंगरावरही साधारण उंची 8.90 आहे. हे मंदिर प्राचीन असून पांडवकालीन आहे. पांडवांना वनवासाच्या काळात या डोंगरावर थांबल्यावर देवीचा साक्षात्कार झाला. त्यांना एका गुहेत तीन मुखी मूर्ती दिसली. पांडवांच्या मनात आले की आपण या मंदिराचा जीर्णोद्धार करावा आणि ते मोठ्या दगडात बांधावे. त्यांनी एका रात्रीत मंदिर बांधले, परंतु मंदिर पूर्ण होत असताना कोंबडा आरवल्यामुळे म्हणजेच ब्राह्ममुहूर्त सुरू झाल्यामुळे काम थांबवले आणि पांडव तिथून निघून गेले. या मंदिराला दरवाजा नाही, हे एक मोठे गुहेतील मंदिर आहे. देवीची मूर्ती तीन मुखी असून साक्षात महालक्ष्मी देवीचा अवतार आहे. या देवीला खोंदाई माता या नावाने ओळखले जाते. काळ भैरवनाथाचे मंदिर नदीकाठी आहे. खोंदाई मातेच्या या गुहेतून पूर्वी पानशेत (वेल्हा ता.) येथे तेथील भगत जात होते. आतमध्ये सात बोगदे होते, तसेच नक्षीकाम केलेल्या विहिरी होत्या, पण आता त्या मातीमुळे बुजल्या आहेत. पूर्वी, मंदिरात नैवेद्य दाखवण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी भांडी मागितली की देवी माता आपोआप भांडी देत असे. परंतु लोकांच्या असुरी बुद्धीमुळे काही लोकांनी भांडी चोरल्यामुळे आता ती भांडी लोप पावली आहेत. खोंदाई मातेला जो शरण जातो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. नवरात्रामध्ये नऊ दिवस या मातेचा उत्सव साजरा होतो. या देवीची यात्रा का निघते याचे कारण ग्रामस्थ सांगतात की, नवरात्रीत घट बसवल्यानंतर आणि घट उठताना पहाटे म्हणजे दसरा झाल्यानंतर हा सण साजरा केला जातो नंतर काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचा विवाह होतो. हा विवाह मुठा नदी काठावरील काळभैरवनाथ मंदिरात पहाटे केला जातो. विवाहाच्या तिसऱ्या दिवशी या देवाची वरात पालखी स्वरूपात छबिन्यासारखी निघते. काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता बहिणीला भेटण्यासाठी गाभाऱ्याला उजवी घालून, मुठा नदीच्या कडून वाजत-गाजत वरात शेडगेवाडीच्या दिशेने डोंगरावरील खोंदाई मातेच्या गुहेतील मंदिरात जाते. खोंदाई प्रतिष्ठानच्या आणि भैरवनाथ मित्र मंडळाच्या वतीने शेडगेवाडी आणि माळेगाव मध्ये पालखीचे भव्य स्वागत केले जाते. तिथे देवीची आरती झाल्यावर देव तिचे दर्शन घेऊन पुन्हा खाली माळेगावात येऊन तलवार नाचवतो. हा खेळ पाहण्यासाठी ग्रामस्थ आणि बाहेरगावातील भक्त मोठ्या संख्येने येतात. हा खेळ झाल्यावर पुन्हा पालखी नदी काठावरील काळभैरवनाथ मंदिरात नेली जाते, जिथे सर्व भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते.
तेथील निसर्गरम्य वातावरण पाहून मन प्रसन्न होते, आणि खोंदाई देवीचे दर्शन घेण्याचे भाग्यही मिळते. म्हणून वर्षातून एकदा तरी तिथे भेट द्यावी. दसरा झाल्यानंतर हा उत्सव साजरा केला जातो.
फोटो :- ऋषिकेश चव्हाण , पै. रंजित मोहोळ
माहितीसंकलन :- पै. रंजित मोहोळ
=======================
माहितीसंकलन :- पै. चंद्रकांत मोहोळ
अध्यक्ष मामासाहेब मोहोळ कुस्ती महा संघ
आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच

खोंदाई देवी मंदिर विषयी माहिती

पुणे ते खोंदाई देवी मंदिर
कालावधी: २ ते ३ तास

काय अपेक्षित कराल

निसर्गरम्य वातावरणातून रस्त्याने जाणारी वाट.
भव्य असे मोठे मंदिर उभारण्यात आले आहे.

सर्वोत्तम वेळ भेट देण्यासाठी

– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.

तिथे पोहोचण्याचा मार्ग

मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. खोंदाई देवी मंदिर पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.

हायकर्ससाठी सूचना

किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.

मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.


admin

Published: मे 16, 2025

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

संबंधित पोस्ट्स

मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा

आंबेश्वर महादेव मंदिर
  • Author: admin
  • 5 min Read

आंबेश्वर महादेव मंदिर

मुळशीतील सौंदर्यरत्ने. "श्रावणविशेष" आंबेश्वर महादेव मंदिर आंबेगाव. नमस्कार मित्रांनो...

Subscribe to our newsletter

Let’s make an interesting journey throughout our planet

backtotop