ऐतिहासिक वीरगळ

  • Author:
  • ५ मिनिटे वाचा

ऐतिहासिक वीरगळ

मुळशी तालुक्यातील ऐतिहासिक वीरगळ.
नमस्कार मित्रांनो आज आपण मुळशी तालुक्यातील, वीरगळीं विषयी माहिती घेणार आहोत.

प्रथमतः आपण वीरगळ म्हणजे काय? हे माहिती करून घेऊ.
वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला दगडांचा स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात.
एका पाषाणाच्या शिळेवर काही विशिष्ट शिल्पांकन करून तो पाषाण स्तंभ उभा करणे आणि त्या वीराचे स्मरण करणे; तो पाषाण स्तंभ म्हणजेच वीरगळ.
तसेच गधगळ, सतीगळ, हे देखील काही प्रकार आहेत.
वीरगळ परंपरा ही कर्नाटकातून महाराष्ट्रात आली असे मानले जाते. कर्नाटक राज्यात मोठे मोठे वीरगळ आढळून येतात, त्यातील काही वीरगळ हे शिलालेखांनी युक्त आहेत. महाराष्ट्रात शिलालेख कोरलेले वीरगळ तुलनेने कमी आहेत. कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड. वीरकल्लू म्हणजे वीरांचा दगड. त्यावरून महाराष्ट्रात वीरगळ असा शब्द प्रचलित झाला असावा.
साधारण दोन-अडीच फुट उंचीच्या दगड़ावर चार-पाच चौकटी असतात. एकदम खालच्या चौकटीत आडवा पडलेला वीर असतो. त्याच्यावरच्या चौकटीत युद्धाचा प्रसंग असतो. त्याच्यावरच्या चौकटीत अप्सरा त्या वीराला स्वर्गात घेऊन जात आहेत अस दाखवलेले असते, त्याच्यावरच्या चौकटीत तो वीर आपल्या पत्नीसोबत शिवलिंगाची पूजा करताना दाखवले जाते. आणि सगळ्यात वरती मध्यभागी शिवलिंग असते, व शेजारी सूर्य आणि चंद्र दाखवलेले आढळतात. याचा अर्थ जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत त्या वीराचे स्मरण लोकांना राहावे.
आणि वीराला स्वर्गात नेताना दाखवतात कारण युद्धात वीरगती प्राप्त झाली म्हणजे स्वर्ग प्राप्ती होते असे मानले जाई.
आणि जास्त शिवपूजाच दाखवली जाते कारण बहूतेक वीरांची उपास्य देवता शिव असते म्हणून शिवपूजा दाखवली जाते.
वीरगळवर शिलालेख आढळत नाही त्यामुळे त्यांना इतिहासाच्या मूक साक्षीदार मानल्या जातात.
आता आपला मुळशी तालुका सुद्धा ऐतिहासिक असल्यामुळे आपल्या तालुक्यातील सुद्धा बऱ्याचशा गावांमध्ये वीरगळ आढलून येतात, त्यातील काही गावे पुढील प्रमाणे.
कोंढावळे, भादस, दारवली, पिंपरी, अकोले, उरावडे, आंदगाव, पिरंगुट, भूगाव, भुकुम, घोटावडे, कोळवण अश्या व अजुन काही गावांमध्ये वीरगळ आढलुन येतात.
परंतु एवढा मोठा इतिहास लाभलेला आपला मुळशी तालुका परंतु अजून या वीरगळीं ची काय अवस्था आहे हे आपण जाणतोच.
प्रत्येक गावातील तरुणांनी आपआपल्या गावातील वीरगळीं चे संवर्धन व जतन केले पाहिजे.

ऐतिहासिक वीरगळ विषयी माहिती

पुणे ते ऐतिहासिक वीरगळ
कालावधी: १.३० ते २ तास

काय अपेक्षित कराल

दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.

सर्वोत्तम वेळ भेट देण्यासाठी

– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.

तिथे पोहोचण्याचा मार्ग

मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. ऐतिहासिक वीरगळ पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.

हायकर्ससाठी सूचना

किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.

मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.


admin

Published: मे 16, 2025

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

संबंधित पोस्ट्स

मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा

Subscribe to our newsletter

Let’s make an interesting journey throughout our planet

backtotop