मुळशीचं निसर्ग वैभव – देवराई – घुटकेची पाळणजाई , आडगावची म्हातोबा , भोडेची वाघजाई
देवराईचा इतिहास – वैदिककाळापासून देवराईची संस्कृती चालत आलेली आहे. देवराईच्या संकल्पनेत श्रद्धादडलेली असून देवावरील श्रद्धायुक्तभीतीचा प्रभावीवापर जंगलाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केला गेला.
पर्यावरणाच्यादृष्टीने देवराई चे महत्त्व – देवाच्यानावाने राखून ठेवल्याने या वनाची वृक्षतोड होत नाही. अत्यंतघनदाटअसल्याने देवराईमध्ये उंचच उंच वृक्ष, जाडजूडखोडे असलेल्या व अगदी जमिनीवर पसरलेल्या वेली , पाचोळ्याचा मोठा थरांतून धावणारे पशूपक्षी आढळतात. इथले बारमाही वाहणारे झऱ्यांचे पाणी परिसरातील मानवांना आणि पशूपक्षांना होतो. विविध औषधीवनस्पतींचे भांडार इथे असते. प्राण्यांच्या अनेक दुर्मिळवनष्ट होत असलेल्या प्रजाती फक्त देवराईत आढळतात. अनेक दुर्मिळ वनस्पतींची रोपे आणि उत्तमप्रतिच्या बियांचा खजिना देवराईत सापडतो तसेच शुद्धप्राणवायूही मिळतो.
पश्चिम घाटामध्ये अनेक शतकांपासून निसर्ग संवर्धनाची परंपरा आहे. तेथील आदिवासींपैकी मुख्यत्वे महादेवकोळी समाजाने निसर्गावर व त्यारूपातअसलेल्या देवतेवरील श्रद्धेपोटी देवराई जतन केल्या आहेत. स्थानिक लोकत्याला ‘देवराठी’ तसेच ‘देवाचंबन’ असेही म्हणतात. स्थानिक तरुणांचे शहराविषयी वाढलेलेआकर्षण, वाढते शहरीकरण, सभोवतालच्या गावातील जमिनींची खरेदी- विक्री आदींमुळे देवराई सारख्या संकल्पनेला धक्का पोचू लागलाआहे. एखाद्या गुंठ्यापासून कित्येक एकरपर्यंत पसरलेल्याया देवराया अनेक शेतकऱ्यांनी विकल्याआहेत. काही मोठ्या प्रकल्पांमुळे देवराईआता नामशेष होण्याच्यामार्गावरआहेत.
पुणे जिल्ह्याचा विचारकरता बहुतांशी देवराया पश्चिमघाटात आहेत. भोर ,वेल्हे , मुळशी , मावळ , खेड , आंबेगाव आणि जुन्नर या पट्ट्यात देवराईं चे प्रमाणमोठे आहे. त्यात मुळशी तालुक्यात सुमारे दीडशे देवराया होत्या. सध्यामुळशीत किमान सत्तर ते ऐंशी देवराया पाहावयास मिळतात. भोरमधील सोमजाई ,करंजाई , वेल्ह्यातील शिरकाई , मावळ मधील आजिवली , खेड मधील शिवे , भोरगिरी , आंबेगावची भीमाशंकर तर जुन्नरमधील आहुपे आदी देवराया आजही तगधरून आहेत.
त्यातील काही देवरायांची माहिती
१) पाळणजाई – घुटके (ता.मुळशी ) – पिंपरी पॅांईंट सोडल्यावर घनगड व तैलबैलाच्या किल्ल्याकडे जाताना भांबर्डे गावाच्या अलिकडे घुटकेची पाळणजाई ही देवराई आहे. श्रद्धाम्हणा अथवा अंधश्रद्धा म्हणा पण मूल होण्यासाठी या देवराईतील देवाला नवस केला जातो. मूल झाले की देवाला पाळणाअर्पण केला जातो. अतिशय घनदाट झाडी असलेल्या या पाळणजाई देवराईला स्थानिकांनी अद्याप तरी जतन करून ठेवलेले आहे.
२) वाघजाई देवीचंबन – मुठाखोऱ्यातील भोडे (ता.मुळशी) येथील वाघजाई ही देवराई चाळीस एकर मध्ये पसरलेली असून सर्वाधिक जैवविविधता या देवराईत आढळते. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी तिला जिवापाड जपले असून संरक्षण केलेले आहे.
३) आडगावची म्हातोबा देवराई – भांबर्डेच्या अलीकडेही देवराई असून अतिशय घनदाट झाडी आणि जैव विविधतेची रेलचेल या देवराईत पाहावयास मिळते. दरवर्षी येथील रानातील एक उंच झाड तोडून तिची पूजा केली जाते. त्यानंतर खांदेकरी भाविक खांद्यावरही काठी (कावड) हिंजवडी येथील म्हातोबा मंदिरात आणतात. त्यानंतर हिंजवडीत कावड यात्रा भरवली जाते.
४) निवांत, निराळी आजिवलीची देवराई – निसर्गाचा आल्हाददायी सहवास : अनेक पर्यटनस्थळांचा एकत्रित संगम – मुळशीच्या सीमेतील स्पर्श करणारी पण मावळ तालुक्यात असणारी ही देवराई.
किल्ले, धार्मिकस्थळे, समुद्रकिनारे किंवा पाणवठ्यांचे परिसर आदींचा एकत्रित समावेश असलेले स्थळ म्हणजे ‘आजिवलीची देवराई’! .दाटजंगल, हिरवी गार उंचच उंच झाडी,अंगावर येऊ पाहणारा सुमारे अर्धा ते पाऊण किलोमीटर लांबीचा डोंगरकडा, समोर विस्तीर्ण निळ्या भोरपाण्याचा पवना जलाशय, तुंग, लोहगड; तसेच विसापूर किल्ल्यांचे दर्शन आणि सोबत निसर्गरम्य वातावरण अशा विविध वैशिष्ट्यांनी युक्त अशी ही देवराई .मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या दक्षिणेला तर तिकोना किल्ल्याच्या पश्चिमेला ही देवराई आहे. येथील वाघजाई देवस्थान नवसाला पावणारे असल्याने मुंबई, पुणे तसेच अन्यठिकाणांहून येणाऱ्या भाविकांची संख्याउल्लेखनीय आहे. वाघजाई देवीचे लोखंडी पत्र्याचे आच्छादन असलेले मोडकळीस आलेले शेड व जामंदिरया देवराईच्या डोंगरकड्यावर असून, त्यात पाषाणातील मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मूर्तीच्या मागील खडकात सुमारे आठ फूट उंचीची तसेच अडीच ते तीन फूट रुंदीची गुहा आहे. लांबीचा अंदाज अद्यापतरी कुणी घेतल्याचे ऐकवत नाही. पक्षिमित्र, प्राणिमित्र; तसेच वृक्षमित्रांनीही देवराई आवर्जून पाहण्यासारखीच आहे. इथे रणरणत्या उन्हात कोणत्याही वृक्षाखाली तुम्ही बसलात, तर विविध पक्ष्यांचे आवाज तुम्हाला साद घालतात. महाराष्ट्रात भीमाशंकर येथील जंगलात आढळणारा आणि इतरत्र क्वचितच आढळणारे शेकरू याठिकाणी पाहावयास मिळते. याशिवाय माडाच्या झाडावरील माडी पिण्यासाठी टपून बसलेली वानरे, माकडे यांचाही सतत वावर असतो. सुमारे अकरा एकर क्षेत्रातही देवराई विस्तारली असून, सर्वत्र रायवळ वृक्षांशिवाय हजारो माडांच्या वृक्षांची; तसेच दुर्मिळवनस्पतींची रेलचेलआहे. येथील सुमारे अर्ध्याफूट जाडीच्या व शेकडो फूट लांबीच्या मोठ मोठ्या वेलींवरचढून उंचवृक्षांवर जाण्याचा; तसेच हिंदोळे घेण्याचा आगळा-वेगळा अनुभवही घेता येतो.
१) कोळावडे (ता.मुळशी) – येथील वाळंजाई देवराईतील मूर्ती.
२) भोडे (ता.मुळशी) – येथील वाघजाईची देवराई
३) आडगाव (ता.मुळशी) – येथील म्हातोबाची देवराई
पुणे ते कोळावडे
कालावधी: १.२० – २ तास
अवघडपणाची पातळी: मध्यम
—————————————–
पुणे ते भोडे
कालावधी: १.३० – २ तास
अवघडपणाची पातळी: मध्यम
—————————————–
पुणे ते आडगाव (भांबुर्डे जवळ)
कालावधी: २.३० – ३ तास
अवघडपणाची पातळी: मध्यम
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. देवराई पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 3, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा