आजची आपली दुसरी दुर्गा आहे, कोराईगडावरील कोराईदेवी. मुळशी तालुक्यातील कोरे बारसया मावळात कोराईगड हा किल्ला आहे. याच किल्ल्यावर गडदेवी कोराईदेवीची शेंदूर चर्चित चतुर्भुज मूर्ती असून, मूर्ती अतिशय विलोभनीय आहे. अशी अख्यायिका सांगितले जाते की १८१८ मध्ये जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला जिंकला तेव्हा देवीच्या अंगावरील सर्व दागिने इंग्रजांनी काढून घेतले, व पुढे ते मुंबईच्या मुंबादेवाला घालते आहेत. गडावर या मंदिराचे आता नूतनीकरण करण्यात आले असून, नवरात्री उत्सव काळात आजूबाजूच्या परिसरातील लोक दर्शनासाठी येत असतात. मंदिरातील वातावरण अतिशय प्रसन्न भक्तिमय झालेले दिसते. मंदिराच्या समोर मोठी दीपमाळ असून मंदिराच्या जवळच गडावरील सर्वात मोठी लक्ष्मी तोफ आहे.
मुळशीतील नवदुर्गा – भवानी माता पिरंगुट “सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके। शरण्य त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।। या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।” सर्व प्रथम आपणास शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!!! नमस्कार आज आसून सुरू झालेल्या या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण मुळशीतालुक्यातील नवदुर्गा व त्यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूयात पिरंगुट गावाच्या टेकडीवरील भवानी माता देवीच्या मंदिरापासून
ताम्हिणीची विंझाई माता चांद्रसेनीय कायस्थ प्रभूमंडळींची कुलदेवता असणारी श्री विंझाई देवी हे ताम्हिणी गावचे एक जागृत देवस्थान आहे. समुद्रसपाटी पासून 438 मीटर उंचीवर असणारे हे ठिकाण दाट झाडी आणि आल्हाददायक हवेमुळे अतिशय रमणीय असे आहे. पुणे माणगाव रस्त्यावर ताम्हिणी घाटाच्या अलीकडे असलेले हे एक रम्य ठिकाण आहे. श्री विंझाई देवी देवस्थान ने इथे भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था सुद्धा केली आहे. पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावरून इथे जाण्यासाठी दिवस भर बस उपलब्ध असतात. 21 नोव्हेंबर 1991 रोजी त्रिपुरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या देवस्थानच्या जीर्णोद्धारास सुरुवात झाली. इथे निसर्गाचे लोभसरूप पाहायचे असेल तर पावसाळा संपताना यावे. सर्वत्र हिरवेगार गालिचे आणि आजूबाजूला कोसळणारे असंख्य धबधबे आपल्या पाय खिळवून ठेवतात. जुळा आणि निळा नद्यांचा संगम ताम्हिणी गावाजवळ होतो. ते पाणी पुढे मुळशी जलाशयामध्ये जमा होते.