मुळशी तालुक्यातील ऐतिहासिक अशी पुष्करणी, (बारव) याविषयी माहिती घेणार आहोत.
मुळशी तालुक्यातील प्रवेशद्वार अशी भूगाव व भुकुम या गावांची ओळख आहे.
भुकुम गावाच्या शेवटी हनुमानाचे मंदिर आहे. खालून गावाशेजारून, एक सुंदर ओढा वाहतो.
याच ओढ्याच्या शेजारी शिवलिंगाच्या आकाराची पुष्करणी आपल्याला दिसते. साधारण १८ फूट रुंद तर ३२ फूट लांब असलेली ही पुष्करणी मुळशी तालुक्यातील एकमेव पुष्करणी आहे.
पुष्करणी म्हणजे काय हे पाहिलं समजून घेऊ. विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर. जुन्या काळी अशा विहिरी बांधण्याची पद्धत होती.