मुळशीतील सौंदर्यरत्ने. “श्रावणविशेष” आंबेश्वर महादेव मंदिर आंबेगाव.
नमस्कार मित्रांनो आज आपण मुळशी तालुक्यातील ऐतिहासिक अशा आंबेश्वर महादेव मंदिराबद्दल जानून घेणार आहोत. पुणे लवासा रस्त्यावर उरावडे गावाजवळ आंबेगाव, मारणेवाडीला जाण्यासाठी फाटाफुटतो येथून एक कि. मी आत आंबेगाव या गावात शंभू महादेवाचे मंदिर पाहण्यास मिळते.
मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे त्याचे नावं आहे ‘कोरबारस मावळ’ कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव या कोरीलोकांचा गड तो कोरीगड होय.. या मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्या सव्वाष्णीघाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सद्यस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे या किल्ल्याला कोरीगड कोराईगड या नावानेही ओळखतात तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठशहापूर या गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखतात याभागातील किल्ले पहावयाचे असल्यास तीन ते चार दिवसांची सवड हवी कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड किल्ले आहेत.
पुण्यापासून २५ किमी अंतरावर लवासा रोडला उरवडे या गावात शाहूमहाराजांचे खासणीस पोतनीस सरदार यशवंतराव पोतनीस यांचा वाडा, पूर्वेकडे तोंड करुन २५० वर्षांनंतरही मोठ्या ताठमानेने उभा आहे.