मुळशी – आध्यात्मिक शक्तिचा अखंड स्त्रोत
अर्हतिक योग आश्रम – मुळशी
आठव्या शतकामध्ये ओड्डीयान नावाचे एक राज्य भारतामध्ये पश्चिम दिशेला होते. हे ओड्डीयान राज्य म्हणजे हल्लीच्या पाकिस्तानातील स्वात प्रांत होय. या प्रदेशाच्या त्याकाळातील राजा इंद्रभुतीला अपत्य प्राप्ती होत नव्हती. अनेक उपचार, देवधर्म करूनदेखील त्याला मूलबाळ होत नव्हते. शेवटचा प्रयोग म्हणून इंद्रभुतीने महासमुद्र यात्रा करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण भारत वर्षाला अगदी सयाम, कंबुज देशापर्यंत त्याने समुद्र यात्रा केली. परतीच्या प्रवासात राजाला एका कमळाच्या फुलामध्ये एक बालक सापडले. राजाने त्या बालकास आपल्या नगरीमध्ये आणले व विधीपूर्वक त्यास दत्तक घेऊन युवराज घोषित केले.
कमळाच्या फुलातून जन्म घेतला ह्या अर्थाने तो बालक पद्मसंभव नावाने प्रसिद्ध झाला.
पद्मसंभवाने उमलत्या वयातच, अध्यात्म, तंत्र यामध्ये विशिष्ट गती प्राप्त केली. सर्वसंग परित्याग, सर्व उपभोगाच्या साधनांवर पाणी सोडून पद्मसंभव वैराग्य मार्गावर पुढे निघाला.
तंत्रमार्गात त्याच्या प्रगतीमुळे त्याचा नाव लौकिक जगभर झाला. सर्व वैदिक साधना करून झाल्यावर व त्यामध्ये अधिकार प्राप्त झाल्यावरदेखील आचार्य पद्मसंभवांचे ज्ञान मिळवण्याची इच्छा वाढतच गेली. ज्ञात असलेल्या भारतीय सर्व सांप्रदायांची साधना करून त्या त्या देवतेस प्राप्त करून घेणारे पद्मसंभव एक अलौकिक भारतीय ऋषी होते.
दुर्दैवाने त्यांच्या भारतातील जीवन व कार्य याविषयी अधिक माहिती मिळत नाही.
त्यांनी बौद्ध सांप्रदायची दिक्षा घेतल्यानंतर, विशेषतः तिबेटमध्ये बौद्ध सांप्रदायाची मुहुर्तमेढ करणे व तिबेटमध्ये पहिला बौद्ध मठ स्थापन करणे, हे त्यांचे कार्य मात्र व्यवस्थितपणे नोंदले आहे.
होय तिबेटमधील पहिले बौद्ध महागुरु म्हणजे आचार्य पद्मसंभव हेच आहेत. पद्मसंभवां विषयी अधिक माहिती तुम्ही स्वतः शोधा.
१९५२ मध्ये चीनमध्ये जन्माला आलेले सॅम्सन चाओ चुई, हे एक कॅथोलिक पंथाचे अनुयायी होते. अध्यात्मामध्ये त्यांनी देखील अगदी बालपणापासूनच गती प्राप्त केली. आध्यात्मिक उपचार, योग या विषयांमध्ये त्यांना विशेष गती होती.
त्यांनी ३० वर्षे संशोधन करून एक नवीन अध्यात्ममार्ग सुरू केला. या मार्गास किंवा पद्धतीस त्यांनी प्राणिक हिलींग असे नाव दिले. प्राणिक हिलींगला आपण मराठीत प्राणोपचार म्हणू शकतो. (प्राणोपचार हा शब्द माझ्या अल्प बुध्दी तुन आला आहे).
प्राणोपचाराचे जागतिक बौद्धीक हक्क व मालकी देखील त्यांनी मिळवली. त्यासोबतच त्यांनी नंतरच्या काळात स्वतःचे नाव देखील बदलून चाओ कोक सुई असे केले. चाओ कोक सुईचा अर्थ चिनी भाषेत जगाचा आनंद असा आहे. स्वतःला मास्टर आणि ग्रॅंड मास्टर अशा उपाध्या देखील त्यांनी मिळवल्या. ग्रॅंड मास्टर चाओ कोक सुई हे अनेकदा म्हणतात की ते आचार्य पद्मसंभवांचे शिष्य आहेत.
त्यांनी प्राणोपचाराची जशी पद्धत विकसित केली तशीच योगाची देखील एक नवीन पद्धत तयार केली. या योगास त्यांनी अर्हतिक योग असे नाव दिले.
याचाच एक भाग म्हणजे प्रगत अर्हतिक योगाचे एक प्रशिक्षण केंद्र आपल्या मुळशी तालुक्यात आहे. माले मुळशी मधुन सरळ कोलाड हायवेने कोलाडकडे निघाल्यास, निवेगावातून थोडे पुढे गेल्यावर, एक फाटा डावीकडे लोणावळ्याकडे जातो. डावीकडे वळल्यानंतर, अंदाजे दोन किमी अंतरावर, ग्रॅंड मास्टर चाओ कोक सुई, यांनी स्थापन केलेला अर्हतिक योग आश्रम गेले दोन दशके कार्यरत आहे. या आश्रमामध्ये प्राणिक हिलींग आणि अर्हतिक योग यातील प्रगत तंत्रे शिकवली जातात. इथे सामान्य माणसास सहज प्रवेश मिळत नाही. आधी पुणे व मुंबई मधून पाणिक हिलींगचे काही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शेवटचे दोन अभ्यासक्रम, पिंप्री, मुळशी येथील आश्रमामध्ये शिकवले जातात.
२००७ साली ग्रॅंड मास्टर चाओ कोक सुई यांनी महासमाधी घेतली.
मुळशी – आध्यात्मिक शक्तिचा अखंड स्त्रोत
आनंद संघ – वातुंडे, मुळशी
[फोटो – पहिल्या फोटो मध्ये परम हंस योगानंद आणि दुस-या फोटो मध्ये स्वामी क्रिया नंद]
नमस्कार मित्रांनो, या सदरामध्ये आपण मुळशी चे एक वेगळे पण पाहणार आहोत. पुणे म्हणजे ही पुण्यभूमी तर हजारो वर्षां पासुन महान अशा आत्म्यांना आकर्षित करीत आले आहे. संत शिरोमणी आणि योगि यांचे मुकुट मणि ज्ञानेश्वर महाराज याच पुण्य भूमीतील. अनेक संत महात्म्यांच्या चरणांनी पावन झालेल्या याच पुणवडी ने शिवप्रभुं ना देखील घडवले. महाराष्ट्राच्या राजकीय, साहित्यिक आणि आध्यात्मिक इतिहासात पुण्याचे स्थान अढळ ध्रुव ता-या सारखेच आहे. याच पुण्याच्या पश्चिमे ला असलेल्या मावळ पट्ट्यात, डोंगर द-यांनी सजलेला मुळशी तालुका वर्तमानात देखील विविध प्रतिभावंतांना आकर्षित करताना दिसतो आहे. मुळशी तालुक्याच्या सर्वच्या सर्व दिशांना किमान एक तरी आध्यात्मिक शक्ति संवर्धनाची केंद्रे आहेत. यास दरामध्ये आपण एकेक करुन मुळशी तालुक्यातील सर्व आध्यात्मिक स्त्रोतां विषयी माहिती घेणार आहोत. स्वातंत्र्य पुर्व काळात, भारतात एक महान विभुति जन्माला आले. शाळा महाविद्यालयीन शिक्षणात जरी गती असली तरी त्यांना त्यात रस नव्हता. त्यांनी नेहमीच हिमालयाची शिखरे साद द्यायची. अगदी शाळेत असताना सुध्दा घरातुन पळुन जाऊन , “मी कोण आहे?” या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी, हिमालयाच्या गिरी कंदरांमध्ये साधना करण्याचा प्रयत्न केला. नंतर च्या काळात योग्य आध्यात्मिक गुरु ला लाभुन त्यांनी सहज योगा ला भारत भूमी मध्ये पुनुरुज्जीवीत केला. खुप मोठी आणि हजारो वर्षांच्या गुरु परंपरे मध्ये अभय मिळाल्याने, त्या युवकाने या संधी चे सोने केले. स्वत ची योग्यता सिध्द झाल्यावर आणि खरी ईश्वरसेवा नक्की काय आहे हे समजल्यावर त्यांनी स्वत चे आयुष्य सहज योगा ला जगाच्या नकाशावर प्रत्येक देशात उमटवण्याचे ध्येय घेऊन जग प्रवासा ला सुरुवात केली. त्यांच्या आध्यात्मिक अधिकारामुळेच, तात्कालिन इतर सांप्रदायांच्या श्रेष्टीं कडुन त्यांना परमहंस ही उपाधी देखील मिळाली. ते परमहंस योगानंद या नावाने ओळखळे जाऊ लागले. जगभरात शिष्य वर्ग आणि सहज योगाचा प्रचार हेच जणु त्यांचे ध्येय झाले. त्यांचा योग आणि आध्यात्मिक अधिकार इतका प्रचंड होता की तो त्यांच्या मृत्युनंतर सगळ्या जगाने पाहिला. ७ मार्च १९५२ मध्ये, त्यांचे शरीर एकदम निश्चेष्ट पडलेले त्यांच्या निकटवर्तीयांना दिसले. ही घटना अमेरिकेमध्ये घडली. अनेकांना वाटले की स्वामीजी मृत्युमुखी पडले. पण त्यांच्या शरीरावर मृत्यु चे कसलेच लक्षण दिसत नव्हते. मृत्युनंतर तब्बल २४ तास होऊन सुध्दा शरीर जसे च्या तसे ताजे तवाने. शरीरावर मृत्युची अवकळा अजिबात नव्हती. तेथील डॉक्टरांना मोठा प्रश्न पडला की इथे मृत्युचे प्रमाण पत्र द्यावे तरी कसे? शेवटी भारतातील त्यांच्या शिष्यांनी फोन वरुन सांगितले की स्वामीजींनी महासमाधी घेतली आहे. महासमाधी घेतल्यानंतर तेथील अभ्यासकांनी स्वामीजींच्या शरीराला जतन करुन ठेवण्याचा निर्णय घेतला. शिष्य वर्ग देखील हसत तयार झाला. पुढे २६ मार्च रोजी त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर एक छोटा सा डाग डॉक्टरांना दिसला. याचा अर्थ त्यांच्या शरीराला मृत्यु ने कवेत घेण्याची सुरुवात २६ मार्च ला झाली, असा होतो. ज्या डॉक्टरांनी शरीराच्या नोंदी निरीक्षणे घेतल्या, त्यांच्या शब्दात स्वामीजींच्या मृत्यु व शरीराविषयी काय लिहिले आहे ते पाहा.
त्याच परमहंस योगानंदांचे एक शिष्य, स्वामी क्रियांनद. त्यांचे मुळ नाव James Donald Walters असे होते पण परमाहंस योगानंदांच्या परीस स्पर्शाने त्यांनी देखील सन्यस्त्य दिक्षा घेतली व “क्रियानंद” हे योगानंदांनी ठेवलेले धारण केले. परमहंस योगानंद असेपर्यंतच स्वामी क्रियानंद वॉशिंग्टन सन्यासी मठाचे प्रमुख व क्रिया योगाचे गुरु म्हणुन जबाबदा-या पाहु लागले होते. स्वामी क्रियानंदांची स्वःतची अशी स्वतंत्र विचारसरणी आणि एक विश्वबंधुत्वाची संकल्पना होती. त्या संकल्पनेला मुर्तरुप देतांना त्यांनी आपल्या मुळशी तालुक्यामध्ये आनंद संघ नावाचे एक आध्यात्मिक ऊर्जा केंद्र सुरु केले.
माझ्या नशीबाने २०११ साली, सहकुटुंब स्वामी क्रियानंदांचा आशीर्वाद, समक्ष घेण्याची संधी मिळाली. एप्रिल २०१३ मध्ये त्यांच्या असिसी या गावीत त्यांचे निधन झाले. स्वामी क्रियानंदा विषयी विकीपीडीयावरील पेज जर पाहिले तर त्यात त्यांचा रिलीजन हिंदुइज्म असे लिहिले आहे.
पिरंगुट पासुन पुढे लवासा रोडने मुठा गावाच्या पुढे गेल्यावर वातुंडे नावाचे गाव लागते. याच गावात डोंगराच्या कुशीत, आनंद संघ नावाचा आश्रम सुरु आहे. या आश्रमामध्ये देश-विदेशातील वैश्विक नागरीक नेहमी येत असतात. इथे सहज योग, ध्यान आदी विषय शिकविले जातात.
कधी शक्य झाल्यास अवश्य भेट द्या वातुंडे येथील आनंद संघास.
पुणे ते अर्हतिक योग आश्रम
कालावधी: १.३० ते २ तास
निसर्गरम्य वातावरणातून रस्त्याने जाणारी वाट.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. अर्हतिक योग आश्रम पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: मे 16, 2025
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा
मुळशीतील सौंदर्यरत्ने. "श्रावणविशेष" आंबेश्वर महादेव मंदिर आंबेगाव. नमस्कार मित्रांनो...