मुळशीतील सौंदर्यरत्ने. “श्रावणविशेष” आंबेश्वर महादेव मंदिर आंबेगाव.
नमस्कार मित्रांनो आज आपण मुळशी तालुक्यातील ऐतिहासिक अशा आंबेश्वर महादेव मंदिराबद्दल जानून घेणार आहोत.
पुणे लवासा रस्त्यावर उरावडे गावाजवळ आंबेगाव, मारणेवाडीला जाण्यासाठी फाटाफुटतो येथून एक कि. मी आत आंबेगाव या गावात शंभू महादेवाचे मंदिर पाहण्यास मिळते.
चाळुक्य शैलीतील बहुतेक खूणा दिसणारे आंबेश्वर हे मंदिर पुरातन काळी मोठं मंदिर असावे अशी शक्यता वाटते. मंदिराच्या दगडी चौकटी आणि इतरही अनेक दगडी शिळा मंदिर जीर्णोद्धारकर्त्यांनी तशाच मंदिराला लावलेल्या दिसतात. कारण मंदिर सोळाव्या सतराव्या शतकात बांधलेले असले तरी मंदिर बांधकामात अनेक ठिकाणी चाळुक्य काळातील अवशेष दिसून येत असल्याने नंतरच्या काळात नेस्तनाबूत झालेल्या या मंदिराचं जीर्णोद्धार केलेलं असल्याचं स्पष्ट जाणवते.
निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेल्या निसर्ग रम्य जागेवर हे मंदिर स्थित आहे. तिन्ही बाजूंनी डोंगर, शेजारी वाहणारा सुंदर असलेला ओढा, जवळच असलेली भातखाचरे, अशा निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे शंभू महादेवाचं सुंदर व प्राचीन असं मंदिर कोणाच्याही नजरेला खिळवून ठेवेल अशा सौंदर्याने नटलेल्या जागेवर निर्माण केलेलं आहे.
मंदिराजवळ प्रवेश केल्यावर आपल्याला अज्ञात मात्र मारणे घराण्यातील पाच वीर पुरुषांच्या समाधी दिसतात. या समाध्या मारणे घराण्यातील सरदारांचे आहेत असे मारणे घराण्यातील वंशजांनी मधून सांगितले जाते. जवळच ओढ्याच्या शेजारी भग्न अवस्थेत एक शिवलिंग आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपले लक्ष वळते ते भग्न अवस्थेत असलेल्या नंदीकडे. मंदिराचे प्रवेशद्वार हे छोटे असून प्रवेशद्वारावरील कोरीव खांब, व त्यावरील द्वारपाल आपल्याला पाहायला मिळतात. प्रवेशद्वारावरील गणेशपट्टीवर अतिशय नाजूक असे कोरीव काम केलेले असून ते अतिशय सुंदर दिसते.
पुढे आपल्याला मंदिरामध्ये वाकून प्रवेश करावा लागतो. मंदिरात आत प्रवेश करताच आपल्याला भव्य असा सभामंडप दिसतो. मंदिराचा कळस छोटा असून तो आतमध्ये धुमटा सारखा दिसतो छतावरील कोरलेले अष्टदिक्पाल पाहून थक्क व्हायला होते. सभामंडपात विविध प्रकारची फुले कोरण्यात आली असून, सभामंडपात हवा खेळती राहण्यासाठी दोन्ही बाजूला नक्षीदार झरोखा ठेवले आहेत. मंदिराच्या समोरील भिंतीवरील दोन्ही बाजूला गणेशाच्या सुंदर मूर्ती आहेत. व विष्पूण देवाची द्वारपाल रूपातील मूर्ती आपल्याला दिसते. मंडपाच्या चारही बाजूना नक्षीदार असे खांब सभामंडपाची शोभा वाढवतात. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर आपल्याला किर्तीमुख दिसते. तसेच गर्भगृहात प्रवेश केल्यावर आपल्याला प्रतिष्ठित असे सुंदर शिवलिंग दिसते. गर्भगृहातील वातावरण अत्यंत शांत असून येथे दर्शन घेऊन मन अत्यंत प्रसन्न होते.
मंदिराचे इतिहास :
तसं मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना विचारले असता ते नेहमी प्रमाणे हे मंदिर पांडवकालीन असल्याचं सांगतात. परंतु मंदिराचे स्थापत्यशास्त्र पाहून हे मंदिर चाळुक्य शैलीतील आहे हे सहज समजून जातं. मंदिराचे जोते उंच असून जोत्यांसाठी मोठमोठ्या दगडांचा वापर केलेला दिसून येतो. हे मंदिर इ. सन व्याते अकराव्या शतकातील असून याचे काम कल्याणीचे चाळुक्य साळुंखेराजेयांच्या काळातील आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे उत्सव साजरा केला जातो. तेव्हा मोठ्या प्रमाणावर आसपासच्या परिसरातील भाविक हे दर्शनासाठी येतात. आपणही एकदा अवश्य भेट द्यावी असे चाळुक्य साळुंख्या काळीन आंबेश्वर महादेव मंदिर.
धन्यवाद
आकाश मारणे
टीम मुळशी.
पुणे ते आंबेश्वर महादेव मंदिर
कालावधी: १.३० ते २ तास
निसर्गरम्य वातावरणातून रस्त्याने जाणारी वाट.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. आंबेश्वर महादेव मंदिर पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: मे 16, 2025
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा