मुळशीतील नव दुर्गा – रावडे (हुलावळेवाडी ) गावातील वाघजाई माता मंदिर
आपण मुळशी तालुक्यातील नवदुर्गा व त्यांची माहिती आपण जाणून घेते आहोत.
आजची आपली आठवी दुर्गा आहे, रावडे हुलावळेवाडीतील वाघजाई माता मंदिर
मित्रांनो आपण पौड पासून पुढे कोळवण रोडवरून पुढे गेलो की डाव्या बाजूस भादस गावाकडे रस्ता जातो,
याच रोडवरील हुळावळेवाडीच्या डोंगरावरील नैसर्गिक गुहेत ग्रामदेवता वाघजाई व वनदेव यांची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहेत.
शेजारी शेजारी दोन गुहा असून यात या ग्रामदेवता विराजमान आहेत
नवरात्रीत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक या देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
मंदिराचा परिसर निसर्गरम्य गुहेचा बाहेरील भाग नैसर्गिक सभामंडपाचे काम करतो.
गावकऱ्यांनी वनदेवाचे छोटेसे मंदिर बांधले असून, बाहेर पायऱ्या केल्या आहेत.
पायऱ्यांच्या खालीच एक दीपमाळ असून, जवळच गोड पाण्याचा एक झरा आहे.
समोर डोंगरावरून आपल्याला मुळशी तालुक्यावर मुक्त उधळण केलेला निसर्ग दिसतो.
चैत्र पौर्णिमेला वाघजाई व वनदेवाची येथे मोठी जत्रा भरते
कधी मुळशी तालुक्यात आल्यावर आडवाटेवरील या वाघजाई देवी मंदिराला नक्की भेट द्या.
धन्यवाद.
आकाश मारणे
टीम मुळशी
पुणे ते नवदुर्गा – वाघजाई माता मंदिर
कालावधी: १.३० ते २ तास
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. वाघजाई माता मंदिर पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 7, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा