अद्भुत तेलबैला – मुळशी
आपल्या मुळशीतील पश्चिमेकडे असलेल्या डोंगररांगांमध्ये, उठून दिसणारे हे सह्याद्रीचे बहुमूल्यरत्न आहे.
सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्याला व्हारसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे “डाईक “; तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर हे अशा रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्टप्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तैलबैलाचा डोंगर हा अशाच प्रकारच्या दोन कातळ भिंतीमुळे लक्ष वेधून घेतो. तैलबैलाची भिंत साधारणपणे १०१३ मीटर / ३३२२ फूटउंच असून उत्तर – दक्षिण अशी पसरलेली आहे. या भिंतीच्या मध्यावर “V ” आकाराची खाच आहे. यामुळे या भिंतीचे २ भागझालेले आहेत. या भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.
प्राचीनकाळी या गावामध्ये बैलांचा तळ पडायचा. या गावापासून पुढे कोकणात उतरणारे दोन जुने घाट मार्ग आहेत. सवाष्णी व वाघजाई घाट. व्यापारी वाहतूक होताना देशावरून आलेल्या मालवाहतुकीच्या बैलगाड्या इथे सोडल्या जात. त्यामुळे या गावाला बैलतळ म्हणजे तेलबैला असे नाव पडले असावे. ही वाहतूक प्रामुख्याने आयात निर्यातिची असायची. कोकणातील विविध बंदरं अश्या घाटवाटांनी जोडली गेली होती. सवाष्णी घाट व वाघजाई घाट देखील बघण्यासारखे आहेत पण तिकडे सह्याद्रीतल्या भटक्यानीच जावे कारण वाटा अवघड आहेत. याच वाटांनी ठानाळे लेणी, सुधागड व सरसगडला देखील जाता येते पण घाट वाटांची माहिती नसेल तर जाणे टाळावे, वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे.
स्थळ – तेलबैलागाव
पोहोचणार कसे – पुणे येथुन पौड मुळशीमार्गे निवे गाठावे. निवेपासुन पुढे उजवीकडे वळून भांबरडेगावी जावे, तेथून तेल बैलागाव. एसटी बस ची सुविधा देखीलआहे पण वेळा अनुरूप नाहीत. स्वारगेटहुन बस आहे तेलबैला गावाला मुक्कामी. स्वारगेट बस स्थानकाशी संपर्क साधुन अधिक माहिती घ्यावी.
तेलबैला आणि घनगड हे दोन्ही एकाच दिवसात पाहुन होते. सोपे जरी असले तरी एक साधी चूकदेखील अपघातास निमंत्रण देते त्यामुळे सह्याद्री. त्यामुळे सह्याद्रीमध्ये फिरताना आगाऊपणा अजिबात करू नये.
जेवणाची सोय नसल्याने जेवणासाठी डबा घेऊन जाने चांगले. पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
पुणे ते किल्ले तेलबैला
कालावधी: २.३० – ३ तास
अवघडपणाची पातळी: मध्यम
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. किल्ले तेलबैला पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 4, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा
तिकोणा गडावरील तळजाई माता. मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यात हा...
आजची आपली दुसरी दुर्गा आहे, कोराईगडावरील कोराईदेवी. मुळशी तालुक्यातील...