ताम्हिणीची विंझाई माता चांद्रसेनीय कायस्थ प्रभूमंडळींची कुलदेवता असणारी श्री विंझाई देवी हे ताम्हिणी गावचे एक जागृत देवस्थान आहे. समुद्रसपाटी पासून 438 मीटर उंचीवर असणारे हे ठिकाण दाट झाडी आणि आल्हाददायक हवेमुळे अतिशय रमणीय असे आहे. पुणे माणगाव रस्त्यावर ताम्हिणी घाटाच्या अलीकडे असलेले हे एक रम्य ठिकाण आहे. श्री विंझाई देवी देवस्थान ने इथे भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था सुद्धा केली आहे. पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावरून इथे जाण्यासाठी दिवस भर बस उपलब्ध असतात. 21 नोव्हेंबर 1991 रोजी त्रिपुरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या देवस्थानच्या जीर्णोद्धारास सुरुवात झाली. इथे निसर्गाचे लोभसरूप पाहायचे असेल तर पावसाळा संपताना यावे. सर्वत्र हिरवेगार गालिचे आणि आजूबाजूला कोसळणारे असंख्य धबधबे आपल्या पाय खिळवून ठेवतात. जुळा आणि निळा नद्यांचा संगम ताम्हिणी गावाजवळ होतो. ते पाणी पुढे मुळशी जलाशयामध्ये जमा होते.
आख्यायिका
फारफारपुर्वी श्रीमहादेव आणि श्रीराम प्रभू हे बंधू विंध्याचल पर्वतावर तप करीत असताना ज्येष्ठबंधू महादेव प्रभू यांनी देवी चरणी आपले शिर कमल वाहून देह त्याग केला. कनिष्ठबंधू श्रीराम प्रभू त्याच विचारात घरी परत न जाता ते तपकरीत असताना त्यांना देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली, ‘तू दक्षिणेकडे तुझ्या घराकडे चाल, मी तुझ्या पाठोपाठ येते. उजाडे पर्यंत डोळे उघडू नकोस आणि मागे पाहू नकोस’. आज्ञेप्रमाणे राम प्रभू डोळे मिटून मार्गक्रमण करीता घराकडे निघाले. पहाटेच्या वेळी गार वाऱ्याची झुळूक आल्यानंतर दिवस उजळा असे वाटून राम प्रभूंनी डोळे उघडून देवी खरोखर येत आहे का हे पाहण्यासाठी वळून मागे पाहिले असता अग्नीचा मोठा लोळ येताना दिसला आणि तो अदृश्य झाला. त्याचवेळी आकाशवाणी ऐकू आली, ‘तू गाई केलीस, मी आता पुढे येणार नाही’. तो अग्नीचा लोळ जेथे अंतर्धान पावला, तेथे एक मोठी शिळा उत्पन्न झाली. पूर्वी हे स्थान डोंगराच्या पायथ्यापाशी आणि दुर्गम ठिकाणी असल्याने देवीचे दर्शन घेणे फारच अवघड होते.
त्याचाविचार करून राम प्रभूंनी देवीच्या मूर्तीची स्थापना जवळच असलेल्या ताम्हिणी येथे केली, अशी आख्यायिका आहे. पुढे भाविक आवर्जून मंदिरात जाण्यासाठी लागले. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी, देवळाच्या भिंती आणि केंबळाचे छप्पर दुरुस्तीचे काम बडोदेकर रामराव बळवंत हरनेकरी यांनी केलेचे पुरावे आहेत. पुढे रघुनाथ माधवराव देशमुख यांनी सांप्रतची देवीची मूर्ती पुण्याहून कारागीर आणून ताम्हिणीच्या डोंगरात चकाळ्या पत्थराची घडवून घेतली. या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा श्री जोशी गुरुजी यांनी १९४२ मध्ये केली.
देवीसाठी मंडळ आणि भक्तांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला आणि वर्ष २००० मध्ये सुंदर मंदिर साकारले. मंदिराला पाच कलस असून, आतील भिंती, गाभा संगमरवरी आहे. श्री विंझाई मातेची मूर्ती अडीच फूट उंचीची, चतुर्भुज महिषासूर मर्दिनीची शिला मूर्ती आहे. उजव्या हातात खड्ग, डाव्या हातात ढाल आणि पुढील उजव्या हातात महिषासुराच्या पाठीत खुपसलेला त्रिशूल आणि डाव्या हातात महिषासुराचे दाबलेले तोंड आहे.
देवीचा उजवा पाय महिषासुराच्या पाठीवर व डावा पाय जमिनीवर घट्ट रोवलेला तसेच पदर खोचलेला, मस्तकावर मुकूट, मोकळे सोडलेले केस आणि पाळावर मालवत अशी प्रसन्न मूर्ती आहे.
पुणे ते ताम्हिणीची विंझाई माता
कालावधी: २ ते २.३० तास
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. ताम्हिणीची विंझाई माता पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 7, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा