जांभुळदेव शिव मंदिर – खुबवली, मुळशी
खुबावली गावाच्या डोंगरावरील ऐतिहासिक जांभुळदेव शिव मंदिर.
नमस्कार मित्रांनो, आज आपण मुळशी तालुक्यातील एक ऐतिहासिक शिव मंदिराची माहिती घेणार आहोत.
मुळशी तालुक्यातील खुबवली व नाणेगाव यांच्या डोंगर शिवेवर जांभूळदेव महादेव मंदिर आहे. महिंद्रा कॉलेज कडून गाडीने, तसेच खुबावली व नाणेगाव कडून या मंदिराकडे जायला पायवाट आहे. मंदिराचा परिसर हा पूर्ण गर्द झाडीत असून मंदिर पूर्णपणे पडले आहे. मंदिराचा फक्त गाभारा शिल्लक आहे. मंदिराजवळ वेगवेगळ्या कालखंडातील विरगळ असून, त्या मातीत गाडल्या गेल्या आहेत. मंदिर बनवताना खूप मोठमोठ्या दगडी शिळा वापरल्या असून, त्यावर विविध कोरीव काम केलं आहे.
हे मंदिर ६०० ते ७०० वर्ष जुने यादव कालीन किंवा यादव काळानंतर काही दिवसांनी बांधलं गेलं असावं असा अंदाज आहे. या मंदिराला बांधताना शुषक सांधा (शुष्क सांधा) या पद्धतीचा वापर केला असून, दगड एकमेकांना खाचेत घालून अश्या प्रकारचे बांधकाम केलं जात. (म्हणजे बांधकाम करताना चुनाचा किंवा दुसरा कोणताही पदार्थ न वापरता दगड एकमेकांना सांधेत आडकवले जातात.) मंदिर परिसरात मंदिराच्या निखाळलेल्या शिळा व दगडी कळसाचे अवशेष आपल्याला आढळून येतात . बाहेर भंग पावलेली नंदीची मूर्ती असून, त्याच जवळ शेषनागाचे कोरलेले शिल्प आहे . आता गाभाऱ्यात गेल्यावर महादेवाची पिंड असून, ती देखील भंग पावली आहे . शेजारी दगडी दिवा असून, गाभार्याचे दगड देखील काही दिवसांनी निखळून पडतील अशी अवस्था झाली आहे .
यादव काळात अनेक मंदिरांची स्थापना करण्यात आली होती. त्यातीलच हे एक जांभुळदेवाचं मंदिर . मंदिराचं नाव जांभूळदेव का? तर या मंदिर परिसरात मोठं मोठी जांभळाची झाडे आहेत, म्हणून हा जांभूळदेव पंचक्रोशीतील गावकऱ्यांची श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर, महाशिवरात्रीला इथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनाला येत असतात गावकऱ्यांच्या मते हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना एक रात्री मध्ये बांधलं आहे. मंदिर संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. तर आडवाटेवरील या जांभूळदेव महादेव मंदिराला नक्की भेट द्या.
धन्यवाद
आकाश मारणे
टीम मुळशी.
पुणे ते नवदुर्गा – जांभुळदेव शिव मंदिर
कालावधी: १.३० ते २ तास
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. जांभुळदेव शिव मंदिर पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 7, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा