मुळशीतील नवदुर्गा – कोराईदेवी कोराईगड (कोरीगड)
आपण मुळशी तालुक्यातील नवदुर्गा व त्यांची माहिती आपण जाणून घेत आहोत. आजची आपली दुसरी दुर्गा आहे, कोराईगडावरील कोराईदेवी. मुळशी तालुक्यातील कोरे बारसया मावळात कोराईगड हा किल्ला आहे. याच किल्ल्यावर गडदेवी कोराईदेवीची शेंदूर चर्चित चतुर्भुज मूर्ती असून, मूर्ती अतिशय विलोभनीय आहे. अशी अख्यायिका सांगितले जाते की १८१८ मध्ये जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला जिंकला तेव्हा देवीच्या अंगावरील सर्व दागिने इंग्रजांनी काढून घेतले, व पुढे ते मुंबईच्या मुंबादेवाला घालते आहेत. गडावर या मंदिराचे आता नूतनीकरण करण्यात आले असून, नवरात्री उत्सव काळात आजूबाजूच्या परिसरातील लोक दर्शनासाठी येत असतात. मंदिरातील वातावरण अतिशय प्रसन्न भक्तिमय झालेले दिसते. मंदिराच्या समोर मोठी दीपमाळ असून मंदिराच्या जवळच गडावरील सर्वात मोठी लक्ष्मी तोफ आहे. नवरात्रीमध्ये एकदा आवश्य भेट द्यावी असे कोराईगडावरील कोराईदेवी मंदिर.
धन्यवाद .
आकाश मारणे
टीम मुळशी
पुणे ते नवदुर्गा – कोराईदेवी कोराईगड (कोरीगड)
कालावधी: २ ते २.३० तास
दाट जंगल आणि वसलेले गाव.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. कोराईदेवी कोराईगड (कोरीगड) पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 7, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा