मुळशीतील # नंदनवन – # वांद्रे # दरी उर्फ # कुंडलिका # दरी
पुण्यापासुन 50 किमी अंतरावर असलेल्या मुळशी तालुक्यामध्ये, निसर्गाने मुक्तहस्ते आश्चर्यकारक अशा नैसर्गिक आविष्कारांची उधळणच केलेली आहे.
वांद्रे दरी किंवा स्थानिक लोक ह्या दरी सपिंप्री दरी असे सुद्धा म्हणतात. पुर्वी कोकणातुन देशावर येणा-यां असंख्य घाट वाटांपैकी एक वाट देखील या दरीतुनच कोकणात उतरते.
पुण्याचे पर्यटक पावसाळ्यात ज्या दरीला पाहून प्रसन्न होतात व देहभान हरवून जातात, वजिलाई इंडीपेंडंस पॉईंट असे म्हणतात, खरंतर तो नजारा असतो, ह्याच वांद्रे दरीचा. वांद्रे दरी म्हणजे, कोकणात वाहणाऱ्या कुंडलिका या नदीचे उगमस्थान. ह्या दरीमध्ये अनेक नैसर्गिक रीतीत तयार झालेले पाण्याचे कुंड आहेत. हे पाणी उन्हाळ्यात देखील अतिशय स्वच्छ आणि पिण्यास योग्य असते. पाय-या पाय-यांच्या नैसर्गिक ठेवणीमध्ये, एकाखाली एक अशी ह्या कुंडांची निर्मिती लाखो वर्षांच्या नैसर्गिक ऋतुचक्रामुळे झालेली आहे. हे कुंड कसे आहे हे खरंतर प्रत्यक्ष पाहण्यासारखे आहे, पण तुर्त सोबतचे फोटो पाहून तुम्हाला अंदाज येईल की मुळशीवर निसर्ग देवता किती मेहरबान झालेली आहे. एखादे चलनी नाणे जर, ह्या कुंडात अगदी तळाशी जाऊन देखील पाण्यावरून देखील स्पष्ट दिसते.
मुळशी फक्त पावसाळ्यातच फिरण्याचे ठिकाण नाही तर, इथे निसर्ग प्रेमी बारा महिने आणि तेराकाळ येऊन मनमुराद निसर्गाच्या सान्निध्यात आनंद घेऊ शकतात. फक्त मित्रांनो, मुळशीत फिरायला जाताना, कृपया कुणीही प्लास्टिक कचरासोबत आणू नका आणि जर आणला असेल तर आपापला प्लास्टिक कचरा बाथल्याने आपल्या सोबतच शहरात परत घेऊन जा.
पुणे ते कुंडलिका दरी
कालावधी: २ ते ३ तास
अवघडपणाची पातळी: मध्यम
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. कुंडलिका दरी पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 7, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा
तिकोणा गडावरील तळजाई माता. मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यात हा...
आजची आपली दुसरी दुर्गा आहे, कोराईगडावरील कोराईदेवी. मुळशी तालुक्यातील...