घनगड
सह्याद्रीच्या घाट माथ्यावर, अगदी दिमाखात उभा असलेला घनगड, एक दिवसीय सहलीसाठी अत्यंत मोक्याची जागा आहे. सोपी चढाई, अवघड ठिकाणी लोखंडी शिडी लावली असल्याने या गडावरुन सह्याद्रीच्या कड्या कपा-यांचे विहंगम दर्शन अगदी कुणालाही घडते. गडाच्या पश्चिमेला सुधागड, सरसगड, तेलबैला दिसतात. तेलबैला व घनगड यामधील खोलचखोल दरी आपले लक्ष वेधुन घेते. ऐतिहासिक महत्व असलेला हा किल्ला मुळशी तालुक्यातील पश्चिमेच्या शीवेवर आहे.
घनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. लोणावळ्यापासून भांबर्डे व त्यानंतर अकोले गाव लागते या गावी घनगडकिल्ला अगदी मध्यभागी आहे. चढायला फारसा अवघड नसणारा किल्ला मात्र देखणा आहे. या गडाचे प्रथम प्रवेशद्वार आजही अस्तित्व टिकून आहे. वाघजाईचे मंदिर पाण्याच्या टाकीच्या दिशेने जाणारी वाट ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. सदर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मात्र तरीही गडमाथ्यावर आजही चिलखती बुरुज, काही वाड्याचे अवशेष, पाच-सहा पाण्याची टाकी आहेत. गडावरून सुधागड अप्रतिम दिसतो. तसेच दरीच्या पलीकडे तैलबैलाही सुंदर दिसतो.
शिवाजी ट्रेल्सण नावाच्या दुर्गसंवर्धन संस्थेने या गडाची डागडुजी केली आहे.(सप्टेंबर २०१३)
कुटुंबा समवेत या किल्ल्यावर एक दिवस आरामशीर घालवू शकतो.
भौगोलिक स्थान[संपादन]
कसे जाल ?[संपादन]
पुण्यापासून घनगड सुमारे १०८ किमी आहे. पुण्यातून अकोले गावात पोहोचण्यासाठी ताम्हिणी घाट/ मुळशीमार्गे, जीवन-तुंगीमार्गे (तुंग-तिकोना) किंवा लोणावळामार्गे जाऊ शकतो. ताम्हिणी-घाटमार्गे जातांना मध्ये देवकुंड, कुंडलिकावॅली, निवे, आडगावपाझरे, भांबर्डे, मग अकोले असा मार्ग आहे. ह्यामार्गाने जवळजवळ १२-२० कमी अंतर कमी होते. आणि दुसरा एक मार्ग म्हणजे पौडगावामधून एक उजव्या बाजूस वळतो. जातांना रस्त्यात तिकोना, तुंग,आणि मोरगिरीगड लागतात. जातांना अतिशय असा सुंदर दृश्य बघायला मिळते.
आणि तिसरा मार्ग म्हणजे लोणावळावरून. इकडूनअंतर जरा जास्त आहे,
इतिहास[संपादन]
छायाचित्रे[संपादन]
किल्ले घनगड ,अवघडचढाई, दगडी गुहेतील मुर्ती, गडावरील गुहा
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे [संपादन]
गडावरील राहायची सोय [संपादन]
गडावर राहण्यासाठीची सोय आहे. वर गेल्यावर एक गुहा आहे तिथे ७-८ जण झोपू शकतात. पाण्याचे एक टाके आहे, ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे.
गडावरील खाण्याची सोय [संपादन]
गडावर खाण्याची काहीच सोय नाही. स्वत येतांना घेऊन यावे. किंवा वर आल्यावर आपण बनवून खाऊ शकता. किंवा गडाच्या पायथ्याशी अकोले गाव आहे. जिथे राहण्याची व खाण्याची सोय आपण गावकऱ्यांकडे करू शकतो.
गडावरीलपाण्याचीसोय[संपादन]
गडावर गेल्यावर शिडी वर चढुन जाताना एक छोटं पाण्याच टाक लागते ते पाणी पिण्यासाठी आहे.
गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]
मार्ग[संपादन]
१. ताम्हिणीघाट/ मुळशीमार्गे, २. पौडपासून उजवीकडे जीवन-तुंगीमार्गे लागतो (तुंग-तिकोना-मोरगिरी) किंवा३. लोणावळामार्गे जाऊ शकतो.
जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]
गडावर जाण्यासाठी ट्रेकर असाल तर 30 मी. खूप झाले आणि नवीन असालतर १/१:३० तास लागतो.
पुणे ते किल्ले घनगड
कालावधी: २.३० – ३ तास
अवघडपणाची पातळी: मध्यम
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. किल्ले घनगड पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 4, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा
तिकोणा गडावरील तळजाई माता. मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यात हा...
आजची आपली दुसरी दुर्गा आहे, कोराईगडावरील कोराईदेवी. मुळशी तालुक्यातील...