#निसर्गरम्य_मुळशीच्या_उश्यापाशी_असलेला_आणि_पासलकरांच्या_अखत्यारीतील_कुर्डुगड
मुळशीच्या पश्चिमेला, मुळशी आणि माणगाव तालुक्याच्या सीमेला शिलेदार असलेला हा किल्ला, माणगाव तालुक्यात मोडतो. पण पुण्यातून जाताना मुळशीमधील सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरच हलकेच डोके वर काढून, खुणावत असल्या सारखा हा किल्ला मुळशीला जास्तच जवळचा आहे. माणगाव हा रायगड जिल्ह्यामधील तालुका आहे. माणगाव हे मुंबई-पणजी महामार्गावर वसलेले आहे. ताम्हीणी घाटामुळे ते पुण्याशीही उत्तम प्रकारे जोडले गेले आहे.
या माणगाव तालुक्यामधे एका अनगड ठिकाणी कुर्डुगडाचा किल्ला दबा धरुन बसलेला आहे. फारसा परिचित नसलेला कुर्डुगड #मोसे #खोऱ्यातील #पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे शिवाजीराजांचे समकालीन आणि सहकारी होते. बाजी पासलकर कुर्डुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला #विश्रामगड असेही म्हणतात.
सुळक्याच्या आकाराचा माथा असलेला कुर्डुगड किल्ला सह्याद्रीच्या कोकणात उतरणाऱ्या एका धारेवर वसलेला आहे. या धारेवर कुर्डुपेठ नावाची लहानशी वस्ती वसलेली आहे. या वस्तीमध्ये कुर्डाई देवीचे मंदिर आहे. म्हणून किल्ल्याला कुर्डुगड असे नाव पडले आहे. जिते गावातून गडावर जाणारी पायवाट २००६ साली झालेल्या प्रचंड पावसामुळे नष्ट झाली. डोंगराचा मोठा कडा ढासळल्यामुळेही वाट बंद झाली. त्यामुळे जिते गावातून कुर्डुगडाचा डोंगर उजव्या हाताला ठेवून दोन-तीन कि.मी. अंतरावरील उंबर्डी गाव गाठावे लागते. या उंबर्डीमधून सध्या गडावर जाणारी वाट आहे.
समुद्रसपाटीपासून ८८२ मीटर उंचीच्या कुर्डुगडास जाण्यासाठी मोसेखोऱ्यातून ही जाता येते. त्यासाठी पुणे- पानशेत मार्गे गाडीने जावून मोसेखोऱ्यातील धामणव्हळ हे गाव गाठावे लागते. हे गाव मुळशीतील अगदी शेवटचे गाव आहे. धामणव्हळजवळून पायवाटेने #लिंग्याघाटाच्या माथ्यावर पोहचून लिंग्याघाटाने खाली उतरावे लागते. अर्ध्या घाटातच कुर्डुगडाचा किल्ला आहे. यासाठी धामणव्हळपासून तीन-तासांची पायपिट करावी लागेल. हा मार्ग जरी अडचणीचा असला तरी निसर्गाची सोबत आणि त्याचे रौद्रत्व मनाला भुरळ पाडणारे आहे. ताम्हीणी घाटातील सर्वात दक्षिणेकडील एका वळणावरुन कुर्डुगड दिसतो. येथे उतरल्यास सर्वात सोयीचे आहे. येथून खिंडीतील वाटेने उंबर्डीला तास दीड तासात पोहचता येते. त्यामुळे वेळ, श्रम व अंतराची बचत होवू शकते.
उंबर्डी मधील प्राचीन मंदिराचे अवशेष पाहून समोरचा डोंगर चढून आपण कुर्डुपेठ मधे दीड तासा मधे पोहोचू शकतो. कुर्डुपेठेतील कुर्डाई देवीचे दर्शन घेवून दहा मिनिटां मध्ये किल्ल्यात पोहोचता येते. वाटे जवळ पाण्याचे टाके आहे. या टाक्यांतील पाण्याचा वापर उन्हाळ्या मधे गावकरी करतात. हे टाके पाहून पुढे आल्यावर काही चढाई करून आपण सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या भागामधे बुुरुज तसेच तटबंदी असे दूर्गावशेष पहायला मिळतात. कुर्डुगडाचे विशेष म्हणजे त्याच्या सुळक्याच्या पोटात असलेली नैसर्गिक गुहा. छताचा भाग हळुहळु कोसळूनही गुहा निर्माण झाली. मोठ्या विस्ताराची ही गुहा जमीन समतल नसल्याने वापरण्या योग्य नाही. पण या प्रचंड गुहेच्या छताने माथ्यावरच्या सुळक्याचे वजन कसे पेलले असेल हे पाहून मात्र आश्चर्य वाटते.
येथून उत्तरकडय़ा वरील हनुमंत बुरुजावर जाता येते. येथे हनुमंताची मूर्ती आहे. ही देखणी मूर्ती मात्र सध्या एक संघराहिली नाही. येथून पूर्व बाजूला आल्यास खालच्या दरीचे उत्तम दर्शन घडते. या बुरुजाला कडे लोटाचा बुरुज असेही म्हणतात. गडावरच्या मुख्य अशा मोठय़ा सुळक्याजवळ एक लहान सुळकाही आहे. या दोन्ही सुळक्यांच्या मध्ये जाण्यासाठी असलेली वाट काहीशी अवघड आहे. छोटा पण आटोपशीर आकाराचा कुर्डुगड पाहण्यासाठी तासाभराचा अवधी पुरेसा आहे. मुक्कामासाठी कुर्डाई मंदिर सोयीचे आहे. वेळेच्या नियोजनाप्रमाणे परतीची वाट आपल्याला निवडता येईल. मात्र कुर्डुगडाचा सुळका आपल्या चांगल्याच स्मरणात राहील. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. राहण्यासाठी खोल्या : किल्ल्यावर असणाऱ्या घळीत राहण्याची सोय होते.
कसे जावे :
पुण्यातुन धामण व्हळला गाडीने जावे व पुढे स्थानिकांच्या मदतीने अथवा सल्ल्याने किल्ला गाठावा.
तसेच माणगाव कडून एस.टी बसने अथवा गाडी मार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव गाठावे लागते.
माणगाव निजामपूर शिरवली जिते असताना साभराचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास एस.टी. अथवा खाजगी वाहनानेही करतायेतो.
किल्ल्याच्या पायथ्याशी कुर्डाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावर जाताना वाटेतच एक भग्न झालेला दरवाजा आढळतो. किल्ल्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळका च होय. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच १ मी. उंचीची हनुमान मूर्ती आपल्यानजर ेस पडते. मूर्तीच्या मागच्या बाजूस एक निसर्ग निर्मित घळ आहे. यात १०० ते १५० माणसे सहज बसू शकतील. किल्ल्यातच दोन भले मोठे सुळके आहेत. आणि हभला मोठा सुळका म्हणजेच गड माथा होय. सुळक्याला पूर्ण फेरी मारता येते पण काही ठिकाणी वाट पूर्णपणे ढासळलेली आहे. किल्ल्यावर पाण्याची एक दोन टाकी आहेत. किल्ल्यावरून संपूर्ण कोकण परिसर न्याहळता येतो. कुर्डुगडाचे स्थान हे फार मोक्याच्या ठिकाणी आहे. पुण्यातून कोकणात येणाऱ्याताम्हणी घाटाच्या वेशीवर चहा किल्ला आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूस रायगड, कोकण दिवा हे किल्ले आहेत. संपूर्ण गड माथा फिरण्यास अर्धातास पुरतो.
पुणे ते किल्ले कुर्डुगड
कालावधी: २.३० – ३ तास
अवघडपणाची पातळी: मध्यम
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. किल्ले कुर्डुगड पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 7, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा
तिकोणा गडावरील तळजाई माता. मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यात हा...
आजची आपली दुसरी दुर्गा आहे, कोराईगडावरील कोराईदेवी. मुळशी तालुक्यातील...