भुकूम गावातील ऐतिहासिक पुष्करणी
नमस्कार मित्रांनो आज आपण मुळशी तालुक्यातील ऐतिहासिक अशी पुष्करणी, (बारव) याविषयी माहिती घेणार आहोत.
मुळशी तालुक्यातील प्रवेशद्वार अशी भूगाव व भुकुम या गावांची ओळख आहे.
भुकुम गावाच्या शेवटी हनुमानाचे मंदिर आहे. खालून गावाशेजारून, एक सुंदर ओढा वाहतो.
याच ओढ्याच्या शेजारी शिवलिंगाच्या आकाराची पुष्करणी आपल्याला दिसते. साधारण १८ फूट रुंद तर ३२ फूट लांब असलेली ही पुष्करणी मुळशी तालुक्यातील एकमेव पुष्करणी आहे.
पुष्करणी म्हणजे काय हे पाहिलं समजून घेऊ. विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर. जुन्या काळी अशा विहिरी बांधण्याची पद्धत होती.
राजस्थानमधील पुष्कर या गावी अशा प्रकारची पहिली विहीर बांधली गेली, म्हणून हे नाव पडलं आहे.
भुकुम गावातील पुष्करणी मध्ये जायला ११ पायऱ्या असून आतामध्ये एका देवळी आहे.
यामध्ये माऊलाई देवीचा तांदळा आहे. पुष्करणीच्या मध्ये एक गोमुख सुद्धा असून, या पुष्करणीकडे पाहून ती साधारण २५० ते ३०० वर्ष जुनी असेल असा अंदाज येतो.
मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई अहिल्या देवी होळकर यांनी अनेक मंदिरे व पुष्करणी बांधल्या.
हीदेखील त्यांच्याच काळातील पुष्करणी आहे.
याबद्दल अजुन काही ऐतिहासिक माहिती मिळाली नाही.
आपणास ठाऊक असल्यास नक्की कळवावे.
धन्यवाद
आकाश मारणे
टीम मुळशी.
पुणे ते ऐतिहासिक पुष्करणी
कालावधी: १.३० ते २ तास
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. ऐतिहासिक पुष्करणी पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 7, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा