श्रीक्षेत्र खारावडे म्हसोबा मंदिर, #मुळशी
पुणे जिल्ह्यातील निसर्ग रम्य # मुळशी तालुक्याच्या रमणीय परिसरातील खारवडे येथे भाविकांच्या भक्तिचे अढळ श्रद्धास्थान असलेले स्वयंभू जागरूक असे नवसाला पावणारे पवित्र भक्तिवैभवी तीर्थक्षेत्र “म्हसोबा देवस्थान” आहे. कौल लवण्याची असलेली पारंपारिक प्रथा म्हणून भाविकांना त्यांच्या अडीअडचणीं तून सोडवणूक करून त्यांना बवन कशी निर्णयाची खात्री देणारे मंगलमय वातावरण असलेले देवस्थान आहे. इ.स. १३ व्या शतकातील श्रीक्षेत्र म्हसोबाची उत्पत्तीची आख्यायिका सांगितली जाते. खारवडे गावातील घनदाट झाडी व बंबूच्या बेटात पालापाचोळा गोळा करत असतानाबुवाजी मारणे यांना निंबोणीच्या झाडाखाली हाताला अचानक शेंदूर लागला. त्याच दिवशी रात्री त्यांना श्री म्हसोबाची उत्पत्ती होत असल्याचे दृष्टांत झाल्याने त्यांनी त्या ठिकाणी उत्खनन केले असता शेंदूर लागलेली मोठी मूर्ती आढळली नितीचही श्री म्हसोबा देवाची मूर्ती होय. त्यामुळेच खारवडे हे देवाचे मूळ स्थान समजले जाते. पूर्वी खेड्यात असे काही देव सापडले की म्हसोबा संबोधत त्यामुळे बुवाजींना सापडलेल्या स्वयंभूमूर्तिलाही “म्हसोबा” असे नाव पडले (असावे). मूर्तिचा आकार शंकराच्या पिंडीसारखा (निमुळता) असून भगवान शंकराचा हाच अवतार असल्याचे मानले जाते कारण शंकराप्रमाणेच हादेखिल लवकर प्रसन्न होतो! मूर्ति सापडल्यावर त्या वेळी केंबळाचे (गवताचे) देऊळ उभारण्यात आले. आंदगाव येथील कै. वामनकाका खोले यांनी मूर्तीस आकार देऊन देखणे पण आणले. स्वयंभूमूर्ति शेजारी एक पितळी मूर्ती असून ती देखील श्री म्हसोबा देवाचीच आहे. त्याशेजारी एक त्रिशूल देखील आहे. मारणे यांच्या घरातर्फे देवाची पूजा अर्चा, धार्मिक विधि होऊ लागले. नियमित येणाऱ्या भाविकांमुळे पंचक्रोशितीलही भाविक येऊ लागले. भाविकांची गर्दी होऊ लागली. देणगीही मिळू लागल्याने मिळालेली देणगी, ग्रामस्थानची वर्गणी व हरिभाऊ कचरे यांच्या उत्पन्नाची रक्कम एकत्र करून बहुलिचे श्री. दिसले यांना मंदिर बांधकामाचे कंत्राट देऊन मंदिर उभारणी दी. ६-४-१९३६ रोजी केली.
देवाची नेमित्तिक पूजा अर्चा करणाचे अधिकार ठराविक घराण्याकडे असतात; त्याप्रमाणे महादेव कोळी घराण्याकडेक खारवडे गावातील सर्व देवांची पूजा अर्चेचामान आहे. दैनंदिन धार्मिक विधिवत पूजा नंतर दु. १२ वाजता देवाची आरती होते. नंतर वरण-भात अथवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. महिन्याच्या दर पौर्णिमेला रुद्राभिषेक केला जातो. चैत्र पौर्णिमा महादेवाचा वार्षिकोत्सव; त्या दिवशी महारुद्राभिषेक करण्यात येतो. नव रात्रात घटस्थापने पासून देवाचे मुखवटे मारणे घराण्यातून पालखी तून मिरवणूकीने मंदिरात आणले जातात. दसऱ्याच्या दिवशी भैरवनाथ मंदिरापर्यंत व परत श्री म्हसोबा मंदिरात पालखी तून मिरवणूक काढण्यात येते. तेथे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सोनं लुटण्याचा सोनेरी कार्यक्रम करतात. श्री म्हसोबा देवाच्या मूर्तीजवळ वाळंजाई देवीची मूर्ती असते त्याप्रमाणे येथेही देवाच्या उजव्याबाजूस वाळंजाई देवीची मूर्ती आहे. देवाच्या समोरील दोन्ही बाजूला संरक्षक आहेत. दक्षिणेकडून बाहेर पडल्यावर श्री गणपती, श्री मारुती व श्री दत्ताचे मंदिर आहे. ह्या देवांचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर एक पिंड व दोन हत्तींची डगडी मूर्ती आहे. मुख्य मंदिरालगत असलेल्या छोट्या मंदिरातील मूर्तीही आंदगावचे देवाचे भक्त श्री. साळुंके यांच्या घराण्यातील आहे. मंदिराच्या मागे उत्तरेला बुवाजी मारणे यांच्या मूर्ती आहे व तिथे मुंजाबा देवाचीही मूर्ती आहे. खारवडे गावात श्री भैरवनाथ, शंकर, काळुबाई, हनुमान इ. देवांच्या पुरातन मूर्तिव शिवकलेचे स्तंभ आहेत. सर्व देवतांचा समावेश करून कारभारात सुसूत्रतेसाठी विश्वस्त मंडळाची सन १९९३ मध्ये स्थापना करण्यात आली आहे. सन १९३६ मध्ये बांधण्यात आलेल्या पूर्वीच्या देवळाच्या जीर्णोद्धाराचे सुनियोजित निसुबक काम खारवड्याचे शिल्पकार श्री. लक्ष्मण तुकाराम मारणे आणि त्यांच्या सहकारी कै.रघुनाथ राव जोगावडे, कै.लक्ष्मण राव विठ्ठल राव मारणे, कै. नारायण राव मारणे, कै. सखाराम मारणे, श्री.नामदेवराव सोनवणे, श्री.रामभाऊ साळेकर, श्री.सादबा जोगावडे व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून सन १९८० मध्ये सद्य अस्तित्वात असलेल्या मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिरासमोरील श्री दत्त मंदिराच्या संस्थापक श्रीमती. बिरमल, गेनूजी व हरिभाऊ कचरे, कृष्णाजी धावडे या भक्तांनी निस्सिम भक्तिने देवाची सेवा केली. त्याच निस्सिम भक्तिभावाने श्री. रमेश उर्फ बाबा कचरे, विजय कचरे, वांजळवाडीकर देवास सेवा समर्पित करीत आहेत. पूर्वापार परंपरेनुसार सालाबाद प्रमाणे चैत्री पौर्णिमा ‘ हनुमान जयंती’ हा श्री म्हसोबा देवाचा वार्षिकोत्सव असतो तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी श्री भैरवनाथाचा वार्षिक उत्सव ! उदंड उत्साहाने दोन्ही उत्सव साजरे केले जातात. चैत्र पौर्णिमेला सूर्यदयासमयी हनुमानाची षोडषोपचार पूजा करून जन्मोत्सव साजरा केला जातो. श्री म्हसोबा देवास महा रुद्राभिषेक करून दुपारी १२ वा. आरती झाल्यावर गोडाचा नैवेद्य उपस्थित सर्वांस लाडवाचा प्रसाद देण्यात येतो. दुपारी ४ वा. मारणे यांच्या घरातील देवाच्या मूर्तिची पालखी काठ्यांच्या मिरवणूकसह देवळात आणली जातात. तेथे पूजा अर्चा झाल्यावर पुन्हा संध्याकाळी ६ वा. आरती केली जाते. आरती नंतर भक्तांच्या अंगात देव आल्यानंतर श्रद्धेने भाविक त्यांचे दर्शन घेतात. देवही त्यांना श्री फळ, अंगारा प्रसाद म्हणून देतात. रात्रीच्या सुमारास देवांना “छबिना” चांदीच्या पालखी तून देवळास प्रदक्षिणा घालता असताना पंचक्रोशितील आंदगाव, भोंडे, वातुंडे, अटाळवाडी इ. ग्राम देवतांचा मानाचा काठ्यांचा हिसा भाग असतो. यावेळी ‘श्री म्हसोबा – भैरी’ चा चांगभले आशानाम घोष सुरुआस्तो. उत्सवाच्या निमित्त जमलेल्या भाविकांसाठी पंचक्रोशीतील ढोल- लेझीम व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येतात. फार पूर्वी पासूनच वांजळवाडीकरांचा नवसाचात माशा झाल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम होतात. सकाळी ‘ हजेरी’ झाल्यानंतर पारंपारिक कुस्त्यांचा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होते. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी श्री भैरवनाथाचा वार्षिकोत्सव साजरा केला जातो. सकाळी श्री भैरवनाथाची पालखी मधून मिरवणूक काढून विधिवत पूजा-अर्चा करण्यात येते. श्री भैरवनाथ व योगेश्वरी देवी यांचे लग्न असते. निरभ्र आकाशातील चंद्रम्यात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. रात्री १२ वा. देवाचे लग्न लागल्यानंतर चंद्राची पूजा करून चंद्रप्रकाशात ठेवलेल्या आटी व दूधाचा नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद म्हणून देण्यात येतो. मार्गशिर्ष शुद्ध पौर्णिमेस ‘दत्तजयंती’ उत्सवाची ‘गुरुचरित्राचे’ सामुदायिक पारायणाने सांगता केली जाते. पौष महिन्यातील दोन मंगळवारी वनभोजन आयोजित केले जाते. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन देवाला गोडा चा नैवद्य करून वनभोजनाचा कार्यक्रम आनंदात साजरा करतात. वर्षभर सर्व उत्सव ‘उत्सवांमध्ये भगवंत हा मुख्य आहे’ ह्या भावानेच केले जातात. मुठा खोऱ्यातील लढवय्ये जातांना श्रीम्हसोबासाचे दर्शन घेऊन जात असत. सुप्रसिद्ध पराक्रमी वीर बाजी पासलकर देव दर्शनास येत असे. ज्योतिर्पीठाधीश्वर बद्रिकाश्रम हिमालय अनंतश्री. विभूषित स्वामी अमृतानंद देव तीर्थ महाराज शंकराचार्य देवाच्या दर्शनास तीन वेळा येऊन गेले. अशा पवित्र परिसरात दरवर्षी श्री. चंद्रकांत भरेकर व मित्र परिवारांतर्फे मोफत सामुदायिक बिगर हुंडा शुभ विवाह मंगलमयी वातावरणात आयोजित केले जाते. देवस्थान मार्फत भाविकांसाठी तसेच गावाच्या विकासासाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबविले जातात. भारत सरकारच्या ‘निर्मल ग्राम’ स्पर्धेतील निखळ वनिर्भेळ यशाचेच एक उदाहरण होय!
धन्यवाद
आकाश मारणे
टीम मुळशी.
पुणे ते श्रीक्षेत्र खारावडे म्हसोबा मंदिर
कालावधी: १.३० ते २ तास
निसर्गरम्य वातावरणातून रस्त्याने जाणारी वाट.
भव्य असे मोठे मंदिर उभारण्यात आले आहे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. श्रीक्षेत्र खारावडे म्हसोबा मंदिर पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: मे 16, 2025
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा