मुळशीतील नवदुर्गा – लवळे ( दुधाणे वस्ती ) गावातील तळजाई माता मंदिर
आपण मुळशी तालुक्यातील नवदुर्गा व त्यांची माहिती आपण जाणून घेते आहोत. आजची आपली नववी दुर्गा आहे, लवळे गावातील तळजाई माता. लवळे गावातील दुधाने वस्ती वर एक बार माहिती लाव आहे. याचं तलावाच्या काठावर तळजाई देवीचे मोठे मंदिर आहे. गेल्या काही वर्षां पुर्वी या मंदिराचे नूतनकरण करण्यात आले असून, या मंदिराचा भव्य सभामंडप आहे, मंदिरातील देवीची मूर्ती ही तांदळा स्वरूपातील असून, नवरात्रीत मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. यात मुंबईच्या भाविकांची संख्या जास्त आहे. गावकऱ्यांन कडून मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रम घेतेले जातात. चैत्र शुद्ध शष्ठीला मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. तलावाच्या काठावर असल्याने येथील वातावरण हे प्रसन्न व मनमोहक असते. आजूबाजूचा परिसर स्वच्छ व निसर्गरम्य असल्याने वेळ कधी जातो कळतच नाही. कधी लवळे गावात गेलात तर तळजाई देवीचे दर्शन घ्यायला विसरू नका.
पुणे ते नवदुर्गा – तळजाई माता मंदिर
कालावधी: १.३० ते २ तास
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. तळजाई माता मंदिर पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 7, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा