झाखुबाई माता मंदिर

  • Author:
  • ५ मिनिटे वाचा

झाखुबाई माता मंदिर

मुळशीतील नवदुर्गा – चाले गावातील झाखुबाई माता मंदिर
नमस्कार नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आपण मुळशी तालुक्यातील नवदुर्गा व त्यांची माहिती आपण जाणून घेत आहोत. आजची आपली चौथी दुर्गा आहे चालेगावातील झाखुबाई माता. मुळशी तालुक्यातील पौड कोळवण हमरस्त्यावर चालेगावाच्या सुरवातीलाच झाखुबाई देवीच मंदिर आहे. मंदिरच बांधकाम हे लाकडी असून, सभामंडप प्रशस्त आहे. आत मध्ये देवीची काळ्या पाषाणातील शेंदूर चर्चित मूर्ती असून, मूर्ती ही चतुर्भुज आहे. या मंदिरच (देवीच) वैशिष्ट्ये अस की, नवरात्री मध्ये जी घटस्थापना होते. ती नऊ दिवस असते, पण या देवीचे घट हे सात दिवसांचे असतात. नवरात्र काळात गावात विविध कार्यक्रम गावकरी घेत असतात. कधी कोळवण खोर्यात गेल्यावर अवर्जून भेट द्यावी असे झाखुबाई माता मंदिर.

धन्यवाद.
आकाश मारणे
टीम मुळशी

झाखुबाई माता मंदिर विषयी माहिती

पुणे ते नवदुर्गा – झाखुबाई माता मंदिर
कालावधी: १.३० ते २ तास

काय अपेक्षित कराल

निसर्गरम्य वातावरणातून रस्त्याने जाणारी वाट.

सर्वोत्तम वेळ भेट देण्यासाठी

– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.

तिथे पोहोचण्याचा मार्ग

मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. झाखुबाई माता मंदिर पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.

हायकर्ससाठी सूचना

किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.

मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.


admin

Published: ऑक्टोबर 7, 2024

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

संबंधित पोस्ट्स

मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा

Subscribe to our newsletter

Let’s make an interesting journey throughout our planet

backtotop