मुळशीतील नवदुर्गा – भवानी माता पिरंगुट “सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके। शरण्य त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।। या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।” सर्व प्रथम आपणास शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!!! नमस्कार आज आसून सुरू झालेल्या या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण मुळशीतालुक्यातील नवदुर्गा व त्यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूयात पिरंगुट गावाच्या टेकडीवरील भवानी माता देवीच्या मंदिरापासून पिरंगुट गावाचे आराध्य दैवत असलेल्या या भवानी माता चें मंदिर हे शिवकालीन असून, एक आख्यायिकानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बाजी पासलकर यांनी याच भागात युद्ध करून गनिमानांना पिटाळून लावले होते व बाजी पासलंकारानी नंतर याठिकाणी हे भवानी माता चें मंदिर बांधले आहे. मंदिरात भवानी मातेच्या काळ्या पाषाणातील दोन मूर्ती असून एक शिवकाळातील आहे व एक आताची आहे. नंतरच्या काळात या मंदिराकडे कोणाचं फारस लक्ष गेलं नाही. परंतु पिरंगुटकरांनी आता या मंदिराचा जीर्णोद्धार केले आहे. जुने मंदिर तसेच ठेऊन बाहेर भव्य सभा मंडप बांधला आहे. तसेच मंदिर ट्रस्टच्या वतीने वर्षभर मंदिर परिसरात विविध सामाजिक उपक्रम आयोजीत केले जातात. नवरात्र उत्सव काळात नऊ दिवस विविध कार्यक्रम ट्रस्ट राबवत असते. मंदिराबद्दल अजून जास्त माहिती लवकरच प्रसारित होईल.
धन्यवाद .
आकाशमारणे
टीम मुळशी
पुणे ते नवदुर्गा – भवानी माता पिरंगुट
कालावधी: २ ते २.३० तास
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. मुळशीतील नवदुर्गा – भवानी माता पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 7, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा