११ मार्च १८१८ कोरीगड (कोराईगड) किल्ला…
मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे त्याचे नावं आहे ‘कोरबारस मावळ’ कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव या कोरीलोकांचा गड तो कोरीगड होय.. या मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्या सव्वाष्णीघाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सद्यस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे या किल्ल्याला कोरीगड कोराईगड या नावानेही ओळखतात तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठशहापूर या गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखतात याभागातील किल्ले पहावयाचे असल्यास तीन ते चार दिवसांची सवड हवी कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड किल्ले आहेत.
कोरीगड या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही गडावरील गुहागड प्राचीन असल्याचे सिध्द करतात इ.स. १४८६ मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला इ.स. १७०० मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलाकडून जिंकून घेतला ११ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला मात्र १४ मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारु कोठारावर पाडून त्याने हा गडजिंकला गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला..
——————–
फोटोग्राफी : विपुल जाधव
माहिती : ‘सचिन पोखरकर’
कोरीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फूट उंच आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो.
इतिहास[संपादन]
११ मार्च इ.स. १८१८ रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राण हानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली.
छायाचित्रे[संपादन]
कोरीगड
गडावरील ठिकाणे[संपादन]
कोराई देवीचे मंदिर
गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. ही देवीची मूर्ती दीड मीटर उंच आहे.
गडावरील एकूण सहा तोफ़ां पैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे.
गणेश टाके
गडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कड्याच्या उत्तर भागात काही छोट्यागुहा आहेत.ह्यालाच गणेश टाके म्हणतात.
गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]
गडावर जायचे दोन मार्ग आहेत.उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे. पूर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते. अर्ध्या वाटेवर एक दुघईगुहा व श्री गणेशाची मूर्ती आहे. थोडे वर चढाई केल्यास प्रवेशद्वाराला नवीन लाकडी दरवाजा लावला आहे. गणेश दरवाजातून आत गेल्यावर दोन तोफा दिसतात.
लोण्यावळ्या पासून २५ कि. मी. वर शहापूरला खाजगी वाहनाने जाता येते.
पुणे ते किल्ले कोरीगड
कालावधी: २.३० – ३ तास
अवघडपणाची पातळी: मध्यम
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. किल्ले कोरीगड पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 4, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा