पोतनीस वाडा

  • Author:
  • ५ मिनिटे वाचा

पोतनीस वाडा उरवडे

मुळशीतील सौंदर्यरत्ने
नमस्कार मित्रांनो आज आपण मुळशी तालुक्यातील ऐतिहासिक पोतनीस वाड्याची माहिती घेणारआहोत. पुण्यापासून २५ किमी अंतरावर लवासा रोडला उरवडे या गावात शाहूमहाराजांचे खासणीस पोतनीस सरदार यशवंतराव पोतनीस यांचा वाडा, पूर्वेकडे तोंड करुन २५० वर्षांनंतरही मोठ्या ताठमानेने उभा आहे.
वाड्यासमोर उभे राहिल्यावर आपल्याला २४फूट उंच व ५ फूट रूंद असा महाकाय प्रवेशद्वारपाहून आपल्याला वाड्याच्या भव्यतेचा अंदाज येतो वाड्याची दोन्ही दरवाजे दिंडीसहित अभंग स्थिती मध्ये आपल्याला पाहायला मिळतात दरवाजावर १५×१० चा सज्जावजा मजला असून तो अजूनही सुस्थितीत आहे दरवाजामधून आत गेल्यावर दोन्हीबाजूस असलेल्या ढेलज्या थोड्यापडीक अवस्थेत आहेत पण आपले मूळस्वरूप टिकऊन आहेत पुढे गेल्यावर चोसोपीवाड्याचे काही अवशेष दिसून येतात आत एक जुनी इमारत आधुनिकीकरण केल्यामुळे ववास्तव्यामुळे चांगल्या स्थितीमध्ये दिसते साधारणपणे पाऊण एकर क्षेत्रामध्ये हा वाडा दिसून येतो तट बंदीच्या भिंतींपैकी १ बाजूंची भिंत बऱ्यापैकी अवस्थेत टिकून आहे वाड्याच्या चारबुरुजांपैकी एकाबुरुजांचे अस्तित्व आपल्याला दिसते वाड्याच्या जवळच पोतनीसांचे उत्तर काळात बांधलेले तीन वाडे दिसून येतात वाड्याच्यासमोरच पोतनीस मंडळींनी एका छानश्या चौथर्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे केले आहे त्यावर कमानदार असे बांधकाम करून त्याचे उत्तमप्रकारे जपणूक केलेली आहे याठिकाणी पोतनीसांनी रायगडवरून आणलेला हिंदवी स्वराज्याचा भगवा अखंड फडकवीत ठेवला आहे त्याखाली चौथर्यावर पुढील मजकूर लिहिलेला आहे हा ध्वज श्री शिवछत्रपतीच्यां रायगडवरील स्वराज्याचा आहे श्रीमंत सरदार विठ्ठलराव यशवंतराव पोतनीस यांनी १९ मार्च १७६३ साली रायगड किल्ला पेशव्यांच्या ताब्यात दिल्यानंतर श्री शिवछत्रपती वरील निष्कलंकनिष्ठा व स्वराज्याचा भगवा ध्वज रक्षणासाठी जबाबदारी व कर्तव्य म्हणजे हे निशाण उरवडे येथे आणून श्री शिवछत्रपती यांची मनाची दौलत आदरपूर्वक वाड्या समोर उभारली आहे याचे वर्णन श्रीशांताराम आवळसकर यांनी त्यांच्या रायगडची जिवन कथा यात पुढील प्रमाणे केले आहे रायगड व लिंगाणा किल्ल्यावर पोतनीसांची सत्ता होती ती काढून घेण्याचा माधवराव पेशवे यांनी प्रयत्न केला परंतु माधवराव पेशव्यांच्या अकाली निधनाने ते काम अर्धवट राहिले नारायणराव पेशवे पेशवेपदावर आल्यानंतर परत रायगडच्या मोहिमे चे काम हाती घेण्यात आले छत्रपतीच्या आज्ञेशिवाय पोतनीस पेशव्यांना किल्ला देत नव्हते पेशव्यांचे सैन्य रायगडाला भिडले रायगडवर यशवंतराव मोरे हा हवालदार व त्याच्या हाताखाली बालकाजीराव पलांडे हा सरदार होता आप्पाजी हारे हा पेशव्यांच्या सेनानी होता त्याने साम दाम दंड भेद या सर्व उपायांनी रायगड जिंकला छत्रपतीच्या तख्तास मुजरा करून नगद ५ रुपये सिहांसनासमोर नजर म्हणून ठेवले सिंहासनावर रुप्याचीफुले उधळली रायगडावरील भगवाध्वज पोतनीसांनी उरवडे या गावी चावडीवर उभा केला ठेवापासून आज तागायत प्रतिवर्षी दसऱ्यास ध्वजाचे पूजन करून नव्याने ध्वजफ डकविण्यात आला आहे पोतनीसांच्या देवघरात अष्टभुजा तुळजाभवानीची सुरेख मूर्ती असून म्हाळसाकांत मळवलीची एकविरा व काडक्याचे बापुजी बुवा यांचे टाक आहे वाड्यापासून थोड्याच अंतरावर यशवंतराव पोतनीस यांची जीर्ण अवस्थेत असलेली समाधी पहावयास मिळते हे यशवंतराव पोतनीस म्हणजे थोर सेनानी मुरारबाजी देशपांडे यांचे बंधू महादजी याचे वंशज होय ब्रिटीशांच्या कारकिर्दी मध्ये निर्माण झालेल्या भोर संस्थानात गोपीनाथपंत बाळकृष्ण पोतनीस हे मुख्यमंत्री होते तर त्यांचे बंधू दामोदरपंत हे गृहमंत्री होते यांनी श्री ब्राह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यावरील नितांतभक्तीमुळे व प्रेरणेने उरवडे येथील पोतनीस वाड्यात श्री राम मंदिराची स्थापना केली त्यावेळी येथे श्री गोंदवलेकर महाराज उपस्थित होते व पुढे रामनवमी उत्सव चालू केला तो पुढे आजपर्यंत चालू आहे मुळशीतील सौंदर्यरत्नेच्या मुळशीतील सरदार या भागात आपण शाहूमहाराजांचे खासणीस यशवंतराव पोतनीस व पुढील वंशजांची माहिती घेणारच आहोत
धन्यवाद
टीम मुळशीतील सौंदर्यरत्ने

पोतनीस वाडा विषयी माहिती

काय अपेक्षित कराल

दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.

सर्वोत्तम वेळ भेट देण्यासाठी

– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.

तिथे पोहोचण्याचा मार्ग

मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. पोतनीस वाडा पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.

हायकर्ससाठी सूचना

किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.

मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.


admin

Published: ऑक्टोबर 4, 2024

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

संबंधित पोस्ट्स

मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा

Subscribe to our newsletter

Let’s make an interesting journey throughout our planet

backtotop