गौरवशाली व वैभव संपन्न मुळशी
वाडे – राऊतराव ढमाले वाडा बेलावडे
नमस्कार मित्रांनो
आजआपण मुळशी तालुक्यातील बेलावडे या गावातील सरदार राऊतराव ढमाले यांच्या ऐतिहासिक वाड्याची माहिती घेणार आहोत.
पुणे कोलाड रोडवर; पौड या गावापासून १० किमी अंतरावर बेलावडे या गावात ढमाले देशमुखांचे दोन पुर्वाभिमुख चौसोपीवाडे आजही मोठ्या दिमाखात मुळशीच्या तसेच ढमाले देशमुखांच्या स्वराज्यनिष्टेची तसेच वैभवाची साक्ष देत उभे आहेत.
मावळ खोऱ्यातील ढमाले देशमुखांचा गौरवशाली इतिहास मोठ्या ताठमानेने या वाड्यांच्या रुपात आपणा दिसतो. यावाड्यांपैकी; एका वाड्याचा जीर्णोद्धार त्याच्या वंशजांनी केला आहे. यामुळे ढमाले देशमुखांचा इतिहास व पराक्रम आपणासमोर उभा राहतो. गावात प्रवेश केल्यावर आपण वाड्याजवळ येऊन; त्याच्यासमोर येऊन उभे राहतो. नक्षीदार कमानी असलेला दरवाजा,
तसेच मजबूत बांधा आपल्या नजरेत भरतो. दरवाजाची जुनी सुस्थितीत असलेली ८ फुट उंचीची चौकट व तिलापुर्वीप्रमाणे नवीन बसवलेला दरवाजायामुळे, वाड्याच्या भव्य प्रवेशद्वाराची कल्पना येते. दरवाजातुन आत प्रवेश केल्यावर भक्कम घडी व दगडांच्या; रेखीव जो त्यांवर उभ्या असलेल्या ढेलजा पाहून वाड्याच्या देखणेपणाची जाणीव होते. दोनबाजूच्या सोफ्यांचे लाकुडकाम हे जुन्या व नव्या आधुनिक सुतार कामाचा मिलाप आहे. समोर उभे राहील्यावर समोरची कमान; बाजूच्या कमाणी पाहील्यावर चार पाच पाय-याचढून गेल्यावर, आपण दुस-या मजल्यावर जाता येते..दुस-यामजल्यावर बाजूच्या जीन्यातुन गेल्यावर आतील तीन दालने जुन्या वनव्या बांधकामाचा संगम दाखवतात. मागील बाजूने बाहेर पडल्यावर वाड्याच्या चोहो बाजूची भक्कम तटबंदीपाहून; वाड्याच्या तसेच ढमाले देशमुखांच्या वैभवाची व भव्यतेची कल्पना येते.
या वाड्याकडे पाहिल्यावर, स्वराज्य स्थापनेच्या शपथे पासुन;शिवरायांना साथ देणा-या ढमाले देशमुखांच्या पराक्रमाचा, स्वमिनिष्ठेचा व स्वराज्याविषयी प्रेमाचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. दिवान खाण्यालगतच्या दालनात व्यवस्थीत ठेवलेली शस्त्रे; त्यात तलवारी, भाले ,खंजीर, कट्यारी, ठासणीची बंदूक, ढाल पाहून अंगावर शहारा येतो.
जिर्णोध्दार केलेल्या नव्यावाडयापासून, थोड्याच अंतरावर जुना वाडा जळीत झाल्यावरही; आपलेकाही अवशेष घेऊन उभा आहे. वाड्याचा लांब रुंदपाय-या, दरवाजा,ढेलजा, जोत्यांवरून त्याच्या वैभवाचे व भव्यतेची कल्पना आपण करु शकतो. हा जुना, पडलेला वाडा रंगराव राऊतराव ढमाले यांनी बांधला होता.
ढमाले देशमुख हे घराणे स्वराज्य पूर्वकाळापासून पौड खो-याचे वतनदार होते. त्यांच्या कडे घनगड व कोरीगड हे किल्ले होते. लोहगड, तुंग व तिकोना हे देखील त्यांच्या अख्यात्यारीत होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजनी स्वराज्या स्थापनेची शप्पथ घेतल्यानंतर, ढमाले देशमुख शेवटपर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले.
ढमाले देशमुख हे ७९ गावांचे देशमुख होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावशी, पुतळाबाई या आजोजीराव ढमाले देशमुख यांच्या धर्मपत्नी होत. शिवाजीमहाराजांनी त्यांना चोळी बांगडी साठी २ गावे दिली होती.
‘राऊतराव’ हा ढमाले देशमुखांना मिळालेला सर्वोच्च किताब होय. चंद्रराव ढमाले हे प्रतापगडच्या युद्धावेळी आपल्या सैन्यासह आघाडीवर होते. राणाजी राऊतराव ढमाले हे देखील या घराण्याचे वीरपुरुष होऊन गेले.
सरदार ढमाले देशमुख राऊत राव यांची माहिती आपण मुळशीतील सरदार या भागात घेणारच आहोतच.
फोटोस आभार विकास चौधरी पिरंगुट
धन्यवाद
संशोधन व माहितीसंकलन – आकाश रविंद्र मारणे, मारणेवाडी उरावडे, मुळशी
संपादन – हेमंत ववले, भरेगाव मुळशी.
टीम मुळशी
पुणे ते राऊतराव ढमालेवाडा
कालावधी: १.३० – २ तास
अवघडपणाची पातळी: मध्यम
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. राऊतराव ढमालेवाडा बेलावडे पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 4, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा